शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पावसाचा खरीप पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:42 IST

खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये ...

खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचू लागल्याने सडण्याची भीती व्यक्त केली जात असून ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे.खेडलेझुंगे, रु ई-धानोरे, कोळगाव, सारोळेथडी, धारणगाव परिसरासह पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, कूज, गळ या रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे झालेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी द्राक्षबागा तोडण्याच्या बेतात आहेत. परिसरातील नानासाहेब खडांगळे आणि राजेंद्र जाधव यांनी द्राक्षबागा तोडण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेल्याचे चित्र परिसरामध्ये आहे. काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, सोयाबीन व भुईमूग या पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात पाणी साचल्याने काढणी केलेले बाजरी पीक पावसापासून वाचविण्यासाठी महागडे प्लॅस्टिक कागद खरेदी करून झाकण्यात आले; परंतु पंधरवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील ओल कायम राहिली. त्यातच शेतातून काढणी केलेल्या बाजरीच्या कणसांना सुकण्यासाठी ऊन मिळाले नाही. काढणी केलेली कणसे पावसापासून वाचविण्यासाठी एका ठिकाणी गंज करून झाकण्यात आली; परंतु कणसांना जमिनीतून ओल मिळाल्याने सदरच्या कणसांना मोठ्या प्रमाणावर कोंब फुटले. त्यामुळे मरळगोई येथील प्रमोद दरेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचा महसूल आणि कृषी विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणे गरजेचे आहे. सदर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. दिवाळी सणामुळे सुट्टीवर गेलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने हजर होऊन पंचनामे करणे गरजेचे असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली. सततच्या पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, बुरशींच्या मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भावामुळे द्राक्षबागांवर कुºहाड लावण्याची वेळ बºयाच शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. रु ई-धानोरे येथील नानासाहेब खडांगळे यांनी द्राक्षबागांवर डावणी व बुरशी आल्याने सुमारे दीड एकर द्राक्षबाग तोडून टाकली. बुरशी व डावणीमुळे त्यांचा द्राक्षबाग पूर्णत: संपल्याने त्यांना द्राक्षबाग तोडून टाकावी लागली आहे. छाटणी ते द्राक्ष डिपिंगपर्यंतचा खर्च आणि आज द्राक्षबाग तोडण्यासाठी २ ते ३ रु पये प्रतिझाडाच्या खर्चामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी. जर तसे झाले नाही तर शेतकºयांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे रूई-धानोरे येथील द्राक्ष उत्पादक नानासाहेब खडांगळे यांनी सांगितले. द्राक्ष पिकांसाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला असून, शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पिकांचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धारणगाववीर व खडक परिसरामध्ये नवरात्र आणि दीपावली सणाचे औचित्य साधून झेंडूची लागवड करण्यात आली होती. झेंडूच्या फुलांना भाव मिळून पैसा मिळेल यादृष्टीने लागवड केलेल्या झेंडूला परतीच्या पावसाने शेतकºयांची निराशा केली. परतीच्या पावसाच्या तीव्रतेमुळे झेंडूचे नुकसान झाले आहे. झेंडूच्या झाडांची मोडतोड झाली आहे. त्यावरील फुले मातीमिश्रित झाल्याने धारणगाव खडक येथील सुभाष जाधव यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतावर काढणी केलेले पीक पावसामुळे सुरक्षित ठिकाणी वाहतूक करता येत नसल्याने शेतातच सडू लागले आहे. मका, बाजरी, भुईमुगाला कोंब फुटले आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे चाºयाची टंचाई निर्माण झाली होती; परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे चारा जमिनीवरच पडून असल्याने सडू लागला आहे. त्यामुळे यावर्षी चाराटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. परतीच्या पावसाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, चाºया, पाट, कालवे तुडुंब भरून वाहत आहेत. जास्तीचे पाणी शेतात साचून असल्याने शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक