शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:48 IST

महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा यासाठी आंदोलन करणाºया चौघांविरुद्ध महापालिकेने तक्रार दिल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

नाशिक : महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा यासाठी आंदोलन करणाºया चौघांविरुद्ध महापालिकेने तक्रार दिल्या-नंतर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. महापालिकेकडून शहरात रस्त्यावर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. फेरीवाले यांच्यासह रस्त्यात मांडलेल्या टपºया हटविण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम विभागातील फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्यांवर व्यवसाय करणाºया फूलविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊन त्यांचा माल जप्त केला जात आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी (दि.५) विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी फूलबाजारात जाऊन धडकले. यावेळी, पथकाकडून विक्रेत्यांचा माल जप्त करण्यास सुरुवात झाली. यावेळी, काही विक्रेत्यांनी त्यास विरोध दर्शविला तर काही विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच ठिय्या मांडला. त्यात महिला विक्रेत्यांचाही मोठा सहभाग होता. जप्त केलेला माल परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी काही विक्रेत्यांनी जमाव जमवत आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे विभागीय अधिकाºयांनी सरकारवाडा पोलिसांना फोन करून जादा कुमक मागवून घेतली. यावेळी, महापालिकेचे वाहन अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रवींद्र सावळीराम दिवे, कल्पेश माधवराव रासकर, शेखर माधवराव रासकर आणि पप्पू सुरेश लोखंडे यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मनपाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईत महापालिकेने सुमारे तीन ट्रक साहित्य जप्त केले. दुपारच्या सत्रात सीबीएस मेघदूत शॉपिंग सेंटर तसेच टॅक्सी स्टॅँड परिसरातीलही अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सुमारे १५ दुकानांचे पुढे आलेले ओटे, शेड व टपºया हटविण्यात आल्या. यावेळी, महापालिकेची पाच पथके तैनात होती.फूलविक्रेत्यांना गणेशवाडीत जागामहापालिकेने यापूर्वी डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त असताना फूलबाजार स्थलांतरित करण्याची कारवाई केली होती. संबंधित विक्रेत्यांना गणेशवाडी येथील मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, त्याठिकाणी सोयीसुविधा नसल्याचे कारण दर्शवित विक्रेत्यांनी जाण्यास नकार दिला. राजकीय नेत्यांच्या आश्रयामुळे नंतर कारवाई थांबली. आता पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली असून संबंधित विक्रेत्यांनी गणेशवाडी मार्केटमध्येच स्थलांतरित व्हावे, असा पवित्रा महापालिकेने घेतला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका