कोरोनाकाळात ग्राहकांच्या वीजमीटरचे रीडिंग न घेताच अंदाजे बिले पाठविण्यात आली. लाॅकडाऊन उठल्यावर त्यामध्ये सवलत दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र ऊर्जामंत्र्यांनी नंतर घूमजाव केले. कोरोनामुळे गोरगरिबांचे रोजगार गेले असून, बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने सरकारने त्वरित ही वाढीव बिले मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, अमोल अडांगळे, श्याम गोसावी, किरण गोसावी, विकास जाधव, प्रमोद केदारे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो: पानावर आहे)
वाढीव वीजबिलाविरोधात ‘प्रहार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST