शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आरोपांवर ठाम : महासभेत विचारणार जाब डस्टबिन खरेदी घोटाळा, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:13 IST

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर शिवसेना ठाम असून, आरोग्याधिकाºयांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देडस्टबिन खरेदीतील तफावत निदर्शनास तज्ज्ञांकडूनही मते मागविली

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर शिवसेना ठाम असून, आरोग्याधिकाºयांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी शहरात लावण्यात आलेल्या डस्टबिनची माहिती मागवून महापालिकेने सदर डस्टबिन खरेदीवर अव्वाच्या सव्वा रक्कम मोजल्याचा आरोप केला आहे.शिवसेनेने अतिरिक्त आयुक्त व आरोग्याधिकारी यांना डस्टबिन भेट देत महापालिकेने केलेल्या डस्टबिन खरेदीतील तफावत निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे यांनी पत्रक प्रसिद्धीस देत शिवसेनेने भेट दिलेल्या डस्टबिन या कमी थिकनेस असलेल्या आणि हेवी ड्युटी नसलेल्या, इंजेक्शन मोल्डेड असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी शनिवारी (दि.१६) शहरात बसविण्यात आलेल्या डस्टबिनची इत्यंभूत माहिती मागविली. याशिवाय, त्याबाबत तज्ज्ञांकडूनही मते मागविली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना बोरस्ते यांनी सांगितले, महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबीन या २१.६५ इंचाच्या होत्या, तर सेनेने भेट दिलेल्या डस्टबिन या २७.५५ इंचाच्या होत्या. महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिनचा व्यास १३ इंच, तर शिवसेनेने भेट दिलेल्या डस्टबिनचा व्यास १४.९६ इंच इतका आहे. महापालिकेने खरेदी केलेल्या दोन्ही डस्टबिनची किंमत ३,६०० रुपये आहे, तर सेनेने खरेदी केलेल्या त्यापेक्षा उच्च दर्जाच्या डस्टबिनची किंमत जीएसटीसह २,३०४ रुपये आहे. बाहेर स्टॅण्डसाठी १,५३८ रुपये खर्च येतो, मात्र महापालिकेने त्यासाठी १,८२० रुपये खर्च दाखविला आहे, तर साखळी-कुलुपासह मजुरी म्हणून २,३५० रुपये दाखविलेले आहे. उच्च दर्जाचे मटेरियल मागवले तरी सारा खर्च पाच हजारांच्या पुढे जात नाही. मात्र, महापालिकेने ११ हजार रुपये मोजले आहेत. याबाबत येत्या महासभेत शिवसेना आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले.