शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

घोटी शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:49 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून रूग्ण राहत असलेला परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर संपूर्ण शहर मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्यात आले आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून रूग्ण राहत असलेला परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर संपूर्ण शहर मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे दररोज दररोज व्यापार व उद्योगांच्या निमित्ताने हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून घोटी शहरात देखील कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यामुळे शासनस्तरावरून यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्णय घेण्यात येत असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर घोटी ग्रामपालिकेचे सरपंच संजय आरोटे यांनी शासनाच्या आदेशानुसार आठवडे बाजार तसेच इतर किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी यांची दुकाने बंद करण्यात आली आहे.घोटी या शहराचा तालुक्यातील जवळपास १६ गावांशी संपर्कयेत असून या गावातील शेतकरी आपला भाजीपाला घोटी या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत असतात. यामुळे या ठिकाणी व्यापारी व विके्र ते यांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे या परिसरातील दुकाने, हॉटेल्स तसेच भाजीपाला विक्रीची दुकाने १ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाचे जगभरात वाढते प्रमाण पाहता त्यापासून सुरक्षित राहण्याकरिता स्वत: काळजीघेतली पाहिजे व इतरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थ व व्यापारी यांनी सहकार्य करावे व आदेशाचे पालन करावे असे आवाहन यावेळी घोटी ग्रामपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.जो कोणी या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे पालन करणार नाही त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. घोटीमध्ये तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील नागरिक कामानिमित्त नेहमीच येत असतात. यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.------------------------बेलगाव कुºहेत अधिकाऱ्यांकडून पाहणीइगतपुरी तालुक्यातील घोटी व बेलगाव कुºहे येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी बेलगाव कुºहे परिसरात पथकासह येऊन पाहणी केली.रु ग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे.पुणे व मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ ग्रामपंचायत तसेच नजीकच्या शासकीय रु ग्णालयात देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. वैद्यकीय अधिकारी जी.पी. बांबळे यांनी रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना तत्काळ क्वॉरण्टाइन करण्यात आले असून नातेवाईक आणि रुग्णास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक