शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

घोटीच्या आठवडे बाजारात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:37 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीत शनिवारी आठवडे बाजार व रविवार असे दोन दिवस बंदचा निर्णय ग्रामपालिकेच्यावतीने घेण्यात आल्याने घोटीकरांकडून शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने केली आहे.

ठळक मुद्देसर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीत शनिवारी आठवडे बाजार व रविवार असे दोन दिवस बंदचा निर्णय ग्रामपालिकेच्यावतीने घेण्यात आल्याने घोटीकरांकडून शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने केली आहे.घोटीत आठवडे बाजाराचा दिवस असूनही ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला, सेवा सुरू होत्या, अन्य साहित्याची दुकाने बंद होती. स्थानिक नागरिकांनी या बंदला सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला.                      रविवारी (दि.१४) घोटी शहरात संपूर्णतः बंद पाळणार असून, हे दोन दिवस बंद पाळून सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच्या वेळेत सर्व दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत.याबरोबरच ग्रामपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकान्वये १५ मार्चपासून घोटी परिसरातील होणारे लग्न समारंभ घोटी ग्रामपालिका व पोलीस स्टेशनच्या परवानगीनेच करावे लागणार असून, त्या लग्नाची मुहूर्तवेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वेळेतच असावी, असे आदेश पत्रात नमूद केले आहे. १५ मार्चपासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव पूर्णतः बंद ठेवण्यात येतील. याबरोबरच घोटी गावातील धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच खुली राहतील.

तालुक्यात २६ ॲक्टिव्ह रुग्णइगतपुरी तालुक्यातून २६ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यामध्ये घोटीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण कमी असले तरी रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने आरोग्य यंत्रणा पुनः सतर्क झाली असून, कोविड आयसोलेशन सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे.शनिवार आठवडी बाजार बंदला उत्तम प्रतिसाद लाभला असून, नागरिकांचे असेच सहकार्य लाभल्यास घोटीला कोरोनापासून लांब ठेवण्यामध्ये मोठा हातभार लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे ग्रामपालिका काटेकोर पालन करत असून, सर्वांनी सहकार्य करावे.- रामदास भोर, उपसरपंच, ग्रामपालिका, घोटी. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या