शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज रात्रीपासून लागणार कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:42 IST

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नाशिक :  राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना आणखी झपाट्याने वाढणार असल्याचा निष्कर्ष आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे असलेले निर्बंध अधिक काटेकोर आणि कठोर करण्यात आलेले आहे. यामध्ये नागरिकांनी तसेच विविध प्रकारच्या आस्थापनांनी नियमांचे पालन करावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आता त्यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.  उद्योग व्यवसाय सुरू राहतील, मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना बाधित सोसायट्यांना दंडकोरेानाबाधित असलेल्या सोसायटी इमारतींमध्ये नियमांचे पालन होत नसेल तर त्यांना देखील दहा हजाराचा दंड केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. बांधकामावरील मजुरांना कामावर बोलवितांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकाने केली पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्याचे देखील सुचविण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या