जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारचा आठवडे बाजार देखिल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत असून याकामी सरपंच विकास गायकवाड, उपसरपंच सत्यभामा शिंदे, सदस्य आत्माराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, ग्रामसेवक बाळनाथ बोराडे, भाऊसाहेब शिंदे, गोपी शिंदे, माजी सरपंच कैलास कुऱ्हाडे, पोलीस मित्र प्रकाश शिंदे, संदीप शिंदे, गोरख वाघ आदी प्रयत्नशील आहेत.
जळगाव नेऊरला पाच दिवस कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 16:24 IST
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारचा आठवडे बाजार देखिल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव नेऊरला पाच दिवस कडक निर्बंध
ठळक मुद्देगावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण