शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यात आता कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:53 IST

लोहोणेर : कोरोना रुग्णांची संख्या देवळा तालुक्यात झपाट्याने वाढत असून या महामारीला आळा घालणे गरजेचे असून कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी या बाबत अत्यंत सर्तक होणे आवश्यक आहे. या रोगाने बांधीत असलेले काही रुग्ण काळजी न घेता बिनधास्तपणे सर्वत्र फिरतांना आढळून येत असून नागरिकही विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे शासन नियम न पाळणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी बुधवारी (दि.३१) लोहोणेर येथे घेतलेल्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देनियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

लोहोणेर : कोरोना रुग्णांची संख्या देवळा तालुक्यात झपाट्याने वाढत असून या महामारीला आळा घालणे गरजेचे असून कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी या बाबत अत्यंत सर्तक होणे आवश्यक आहे. या रोगाने बांधीत असलेले काही रुग्ण काळजी न घेता बिनधास्तपणे सर्वत्र फिरतांना आढळून येत असून नागरिकही विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे शासन नियम न पाळणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी बुधवारी (दि.३१) लोहोणेर येथे घेतलेल्या बैठकीत दिले.नागरिकांच्या या निष्काळजी पणामुळे तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ होत असून याबाबत स्थानिक पातळीवर कोरोना केअर सेंटर निर्माण करून कोरोनाचा फैलाव करणाऱ्यांना कॉरंटाईन करण्यात यावे या बाबत योग्य प्रतिसाद न मिळाल्यास तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.देवळा तालुक्यातील बहुतांश गावांत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी डॉ. मांडगे यांनी लोहोणेर जिल्हा परिषद गटातील खांमखेडा, सावकी, विठेवाडी, लोहोणेर, खालप, वासोळ या गावात जाऊन ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा व शासकीय अधिकारी आदींची बैठक घेऊन कोरोना बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.सर्व व्यासायिकांनी कोविड चाचणी करून आपण निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे. व्यवसाय करतांना मास्क वापर, सेनेटायझर वापर व सोशल सिस्टकशन राखणे गरजेचे आहे. या सूचनांचे पालन न करणाऱ्याना पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल तर विना मास्क फिरणाऱ्या कडून ५०० रुपये दंड घेण्यात येईल.गावांत कोविड सेंटर तयार करण्यात यावे व स्थानिक रुग्णांना १४ दिवसांसाठी याठिकाणी रुग्णांना कॉर्नटाईन करण्यात यावे. व घरूनच त्यांना सर्व सुवीधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी यंत्रणेला ग्रामस्थांच्या सहकाऱ्याची गरज असून यंत्रणेला सहकार्य न करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा स्पष्ट इशारा डॉ. मांडगे यांनी यावेळी बोलताना दिला.यावेळी विस्तार अधिकारी राजेश निकुंभ, लोहोणेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश निकुंभ, योगेश पवार, रमेश आहिरे, सतीश देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, मुकुंद मेतकर, निबा धामणे, चंद्रकात शेवाळे, धोंडू आहिरे, ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार, सुुपरवायझर विजय पवार, सोनाली पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या