शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ

By अझहर शेख | Updated: March 18, 2021 14:03 IST

विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्थचक्र थांबवायचं नसेल तर निर्बंधांचे पालन कराकोरोनाग्रस्त रुग्णांचा दर वाढून ३२ टक्क्यांवरमालेगाव मनपा आयुक्तांना रजा रद्द करुन हजर राहण्याच्या सुचनामालेगावात दाहक परिस्थिती, विशेष लक्ष पुरवा

नाशिक : शहर व जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोनाचा कहर सुरु झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांसोबत तत्काळ गुरुवारी (दि.१८) आढावा बैठक बोलविली. या बैठकीत भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व खातेप्रमुखांना कोरोनाच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही, कोणीही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असा इशारा दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या आढावा बैठकीप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव हे प्रमुख अधिकारी उपस्थित आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सर्वच विभागांना कंबर कसावी लागणार आहे. कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणीवर भर देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी स्वैर वागणे सोडावे, आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी सरकारी यंत्रणांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोविडविरुध्द लढ्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, चालढकल किंवा जबाबदारी झटकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी रोखठोकपणे सांगितले. कोविड रुग्णांच्या विलगिकरणाकरिता रुग्णालयांची मदत घ्यावी. दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर ह्यवॉचह्ण ठेवून त्यांची दुकाने बंद करण्याची शिक्षा करावी, जेणेकरुन अन्य व्यावसायिकांनाही धडा मिळेल, असे भुजबळ यांनी सांगितले. लॉकडाऊन हा पर्याय कोणाच्याही फायद्याचा नसून त्याऐवजी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. विलगीकरण केंद्र वाढवून नियमांप्रमाणे लसीकरणावर भर द्यावा. जिल्हाधिकारी आदेश काढतात मात्र खालच्या सर्व यंत्रणांकडून त्या आदेशांची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा आदेश केवळ कागदोपत्री राहतात, असेही भुजबळ यांनी या बैठकीत अधोरेखित केले. लहान-लहान प्रतिबंधित क्षेत्रे (कन्टेंन्मेंट झोन) तयार करुन घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई पोलीस व मनपाने संयुक्तपणे करावी. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कोविडविरुध्दच्या या लढ्यात उतरुन युध्दपातळीवर काम करत पंधरवड्यात यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणाविनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला. मास्कचा वापर गर्दीमध्ये सहभागी होणे टाळणे, सामाजिक अंतर राखणे ही त्रिसुत्री नाशिकरांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले, तरच आपण लॉकडाऊनचे घोंगावणारे संकट दूर करु शकतो, असे त्यांनी नाशिककरांना उद्देशून सांगितले. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयChagan Bhujbalछगन भुजबळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस