शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कडक अंमलबजावणी : जिल्हा न्यायालयात 'नो मास्क, नो एंट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 21:59 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमास्कविना वावरणाऱ्यांना तीनशे तर थुंकीबहाद्दरांना एक हजारांचा दंड

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात ह्यनो मास्क नो एंट्रीह्ण नियम सोमवारपासून कडक करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या वकिलांसह पक्षकारांना कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने सूचना करत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या परिसरात विनामास्क फिरताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला ३०० रुपये तसेच आवारात थुंकताना आढळल्यास १ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एका सरकारी वकिलांच्या कार्यालयाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. न्यायालयात खबरदारी घेण्याच्या सूचना नाशिक बार असोसिएशनकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार न्यायालयाच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयितांना न्यायालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. तसेच पास धारक वाहनांना परिसरातील वाहनतळात सोडण्यात येणार आहे. न्यायलयाच्या परिसरात पक्षकारांनी कामाशिवाय जास्त वेळ न थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बाररुम, वकिलांचे चेंबर्स येथे देखील सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस