शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कडक अंमलबजावणीमुळे बाधितांच्या संख्येला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST

निफाड तालुक्यातील मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत होती. निफाड तालुका हा संपूर्ण ...

निफाड तालुक्यातील मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत होती. निफाड तालुका हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असणारा तालुका ठरला होता. आता पाच- सहा दिवसांपासून ती संख्या एकशे तीस रुग्णांवर आलेली दिसत आहे. निफाड तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे व गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी निफाड तालुक्यात कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आणि गावोगावी धडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. इतकेच नव्हे तर बाजारावर होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस शेतीमालाचे लिलाव बंद असल्याने प्रशासनाला कोरोना रोखण्यात कमालीचे यश आले. आणि त्याचबरोबर घोरपडे यांनी निफाड तालुक्यातील गावोगावी कोरोना रुग्ण असणारा परिसरातील रुग्ण घराबाहेर पडू नये व घरातच असावेत, कोरोना फैलाव होऊ नये यासाठी गावोगावी प्रतिबंध क्षेत्राकरिता एक पोलीस कर्मचारी व दोन शिक्षकांची नेमणूक केली व या अंमलबजावणीनंतर कोरोना रुग्ण आढळणाऱ्या परिसरात प्रतिबंध क्षेत्रावर अनिर्बंध व अंमलबजावणी सुरू झाली आहे.

दि.१५ मे रोजी रात्री शासकीय आकडेवारी उपलब्ध झाली असून नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १ हजार ८४५, बागलाण ५४७, चांदवड ५६९, देवळा ४८८, दिंडोरी ७३४, इगतपुरी १८४, कळवण ४९३, मालेगाव २९१, नांदगाव २८८, निफाड १ हजार ४, पेठ ८९, सिन्नर १ हजार ७५, सुरगाणा २९१, त्र्यंबकेश्वर १७३, येवला १४८ असे एकूण ८ हजार २१९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता निफाड तालुक्यातील जनता मास्कसह फिरताना दिसत आहे. मात्र, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे लोक कोरोनाबाबत आता चिंतेची बाब म्हणून पाहत आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत निफाड, सायखेडा व विंचूर येथील बाजार आवारांवर दररोज कांदा व शेतीमालाचे लिलाव होतात. यामुळे देखील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे, असे दिसून येताच लासलगाव येथील बाजारपेठेत सलग दोन आठवडे तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीने एक सप्ताहात लिलाव बंद ठेवले आहेत, तसेच अनपेक्षित निकटचे नातेवाईक व मित्र यांच्या कोरोना पाॅझिटिव्ह अहवालानंतर मागील सप्ताहात मृत्यूच्या घटनेने तालुक्यातील जनता हादरली. आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात शेतीमालाचे लिलाव दि.13 ते मे दरम्यान बंद झाले आहेत. गावोगावी जनता कर्फ्यू शंभर टक्के पाळला जात आहे.