शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:05 IST

नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत अडथळा अस्वीकारार्ह

नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असे करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व व्यवस्थितरीत्या मिळावा तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत माहिती आणि मदतीसाठी ‘टीम संकट सोबती’ तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकाºयाकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून, संबंधित अधिकाºयांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना काही अडचणी येत असतील त्यांनी संबंधित अधिकाºयाला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणींची सोडवणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किराणा दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये कामासाठी येणारा मजूर हा व्यवस्थित आपल्या कामावर जाईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन यांनीदेखील हेल्पलाइन सुरू केली आहे. किराणा दुकाने व मेडिकलमध्ये काम करणाºया व्यक्तींची संख्या कमीत कमी ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.इन्फो-जेवणाच्या थाळ्या देण्याचे नियोजनप्रशासनाकडून जवळपास १० ते १५ हजार जेवणाच्या थाळ्या देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक एकत्र येत आहेत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय या संकटावर मात करणे शक्य नाही. त्यासाठी घराच्या बाहेर पडायचे नाही व सोशल डिस्टन्सीचा नियम पाळण्यात यावा. ज्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपण स्वत:ला व इतरांनाही दूर ठेवू शकू, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी व्यक्तकेला आहे.

टॅग्स :foodअन्नcollectorजिल्हाधिकारी