शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे : नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:55 IST

मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल.

ठळक मुद्देजीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतोआपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही.

नाशिक : मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. यासाठी अंतर्मन बिहर्मन एकत्र करावे यामुळे मनाला स्थैर्य निर्माण होईल व आपले प्रश्न आपोआप सुटतील. असे, प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी समस्या मार्गदर्शन प्रवचन दर्शन सोहळयाप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना केले.      उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आशेवाडी जवळील जनम संस्थानाच्या आश्रमात मंगळवारपासून दोन दिवसीय प्रवचन, दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी असे सांगितले की, जीवनात दु:ख येण्याचे याचे कारण म्हणजे आपल्या वागण्यात असलेला दुष्परिणाम आहे. काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतो चुका होऊ नये म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात यावे. गुरूंच्या कृपेने दु:ख निवारणाची क्षमता निर्माण होते आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. सुख दु:खाला कसे सोडून द्यायचे किंवा कवटाळायचे हे स्वत:वर अवलंबून आहे. आपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही. संयम, चिकाटी, साधक बाधक विचार करता आला पाहिजे. प्रत्येकाचे शरीर व प्रत्येकात चैतन्य सारखेच असते. तुम्ही स्वत: देव आहे आणि तुमचे देवत्व तुमच्या कृतीतून दिसते. अनुभूती केवळ गुरूंच्या सहवासात येते. देवाजवळ पैशांची गरज नसते देव भक्तीचा भुकेला असतो. गुरु प्रती दृढ विश्वास ठेवणे गरजेचे आहे.रोज दहा मिनिटे भक्ती करावी. स्वप्नात कुणाचे वाईट चिंतू नये व कुणाला फसवू नये कुणाला त्रास होणार याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAdhyatmikआध्यात्मिक