शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

टोळीयुध्द रोखण्यासाठी पोलिसांना बळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:08 IST

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याकरिता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिकरोड, जेलरोडसह आदी भागात वाढणारे टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पोलिसांना बळ द्यावे, कारण परिमंडळ-2मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी अधिकाधिक फोफावत असून आता नवे सहायक आयुक्त देखील लाभले आहे, यामुळे नजीकच्या काळात गुन्हेगारीला अटकाव करावा, अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे जनता दरबारात केली.

ठळक मुद्देदीपक पांडेय यांच्यापुढे गा?्हाणे : उपनगर पोलीस ठाण्यात जनता दरबार

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याकरिता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिकरोड, जेलरोडसह आदी भागात वाढणारे टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पोलिसांना बळ द्यावे, कारण परिमंडळ-2मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी अधिकाधिक फोफावत असून आता नवे सहायक आयुक्त देखील लाभले आहे, यामुळे नजीकच्या काळात गुन्हेगारीला अटकाव करावा, अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे जनता दरबारात केली.नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे दिपक पाण्डेय यांनी जाहिर केले होते. शनिवारी (दि.3) सकाळी उपनगर पोलिस ठाण्यात पोलीस अधिकारी, कमर्चारी यांच्या समस्या, अडचणी तक्रारी ऐकून घेतल्यात. उपनगर पोलिस ठाण्याची हद्द समस्या जाणून घेत सर्वांशी चर्चा केली. तसेच उपनगर पोलीस ठाण्यात दुपारी लोकप्रतिनिधी शांतता समिती सदस्य नागरिक यांच्या झालेल्या जनता दरबारामध्ये उपनगर पोलिस ठाण्याला स्वतंत्र नवीन जागा मिळाली असून पोलिस ठाण्याची इमारत त्वरित उभी करावी, पोलिसबळ वाढवावे, बेकायदेशीर दारु विक्री, अवैध धंदे रोखावे अशी सूचना नगरसेवक राहुल दिवे यांनी केली. उद्यान व समाज मंदिरामध्ये मद्यपींच्या रंगणा?्या पार्टी, टवाळखोर यांच्यावर कारवाई करावी. तसेच गँगवार, चेनस्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याची सूचना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केली. माजी नगरसेविका सुनंदा मोरे यांनी अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली. शालेय मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन लावणा-यांवर कारवाई करावी, समाजमंदिरातील टवाळखोरी, गैरप्रकार थांबवावेत, बालगुन्हेगारी रोखावी, गुंडांना तडीपार करावे, पोलिस खब-यांची संख्या वाढवावी आदी मागण्या जनता दरबारामध्ये करण्यात आल्या. आल्या.पोलिसांना पांडेय यांनी दिली तंबीपोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सकाळी पोलीस अधिकारी व कमर्चारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेत प्रत्येकाने सोबत लाठी, शिट्टी, पेन, डायरी ठेवली पाहिजे. परवानगी न घेता मोर्चा, आंदोलन करणा?र्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच उल्लेखनीय काम करणा?्या अधिकारी व कमर्चा?्यांना दैनंदिन रिवार्ड देण्यात येऊन त्याची नोंद घेतली जाईल असे पांडे यांनी स्पष्ट केले.गुंडगिरी मोडून काढणार; पोलीस ठाण्यांच्या कारभार सुधारणारजनता दरबारामध्ये बोलताना पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घालणा-यांवर थेट लाठीमार करणार असल्याचे स्पष्ट केले. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, दुकांनापुढे गर्दी करणे, रस्त्यावर थुंकणे याबाबत शहरात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गँगवार, टवाळखोर, गुंडगिरी करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल. बाल गुन्हेगारी, उद्यान, समाज मंदिरामध्ये दारूच्या पार्ट्या, गुंडगिरी, चेन स्नॅचिंग, अवैध धंदे आदींबाबत तातडीने उपाययोजना केली जाईल. जसा आजार तसे औषध असेल. प्रत्येक शनिवारी आपण एका पोलिस ठाण्याला भेट देऊ असे पांडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे