शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारपेठेतील रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:10 IST

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारात शांतता पसरली होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकाने सुरू असल्याने या दुकानांपुढे ग्राहकांची गर्दीही दिसून आली. 

ठळक मुद्देबंदचा परिणाम : दैनंदिन व्यवहार सुरळीत

नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारात शांतता पसरली होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकाने सुरू असल्याने या दुकानांपुढे ग्राहकांची गर्दीही दिसून आली. कोरोनाला रोखण्यासाठी आखून दिलेल्या निर्बंधानुसार शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी नाशिककरांनी आपली जबाबदारी ओळख आवाहानाला प्रतिसाद दिला. रविवारीदेखील दुकाने बंद होती मात्र खाद्य पदार्थ, चहा, स्वीट मार्ट, कॅफे, डायनिंग हॉल्स, ज्यूस, बेकरी अशी दुकाने सुरूच असल्याने दुकानांमध्ये तरुण-तरुणींची गर्दी दिसून आली. मास्क, डिस्टन्स तसेच सॅनिटायझेशनबाबतची जागरूकता याबाबतच्या नियमांचे पालन होताना दिसले नाही. शनिवारी आणि रविवारी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार नाशिककरांनी पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही सामंजस्याची भूमिका घेतली. रस्त्यांवर गर्दी दिसत असली तरी दुपारनंतर शुकशुकाट होता. खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर निर्बंध नसल्याने तेथे झालेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन संबंधित दुकानमालकांनी केल्याचेही दिसून आले. नाशिकरोड परिसरात पोलिसांची कारवाईप्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककर घरीच थांबत असले तरी दुकानांसमोर होणारी गर्दी देखील प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी शहरात अनावश्यक सुरू असलेल्या दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनेक हॉटेल्स चालकांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या