शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळोबा महाराज यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:59 IST

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.  दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सव असतो. नवसाला पावणारा म्हाळोबा महाराज यात्रेत भाविक नवसपूर्ती म्हणून बोकडबळी देण्याची परंपरा आहे. सोमवारपासून (दि.२९) यात्रेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी म्हाळोबा महाराज यांची विधिवत महापूजा झाली.  रात्रभर भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंदिरात डफाच्या तालावर धनगर समाजाचे भाविक गाणी गायली जात होती. बुधवारी (दि. ३१) स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. चंद्रग्रहण असल्याने भाविकांनी बोकडबळी दिले नाही. दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुस्त्यांची भव्य दंगल झाली. यात नामवंत पहिलवान सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांनी म्हाळोबा महाराज यात्रेस भेट देऊन दर्शन घेतले. तीन दिवस चालेल्या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. पोलीस प्रशासन व यात्रा समितीच्या  सदस्यांनी यात्रा उत्साहात संपन्न होण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.मुखवट्याची स्थापना काठ्यांची डफाच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळी स्थानिक भाविकांकडून मानाचे बोकडबळी देण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे मंगळवारी राज्याच्या कानाकोपºयातून धनगर समाजाचे भाविक दाखल झाले होते. दिवसभर मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. नवसपूर्ती म्हणून बोकडबळी दिले जात होते. सायंकाळी पाऊल टेकडी येथे बाहेरून आलेल्या काठ्यांची भेट घडविण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक