शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडील थकीत रकमेवर वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:31 IST

सटाणा : सटाणा मर्चंट्स को- आॅप. बॅँकेने तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या खात्यावर एक कोटी रु पये वर्ग केल्याच्या विषयासह, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाºयाकडे अडकलेले लाखो रुपये आणि डांगसौंदाणे येथे उपबाजार निर्मितीच्या प्रस्तावावर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा झाली.

ठळक मुद्देसटाणा बाजार समिती : वार्षिक सभा गाजली

सटाणा : सटाणा मर्चंट्स को- आॅप. बॅँकेने तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या खात्यावर एक कोटी रु पये वर्ग केल्याच्या विषयासह, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाºयाकडे अडकलेले लाखो रुपये आणि डांगसौंदाणे येथे उपबाजार निर्मितीच्या प्रस्तावावर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा झाली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभापती संजय पंडित सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रशासनाने यापुढे प्रभावी संपर्क यंत्रणा राबवून शेतकºयांची जास्तीत जास्त उपस्थिती राहील. यासाठी उपस्थित शेतकºयांनी मागणी केली. सुरुवातीला चर्चेत सटाणा बाजार आवारातील कांद्याच्या लिलावातील व्यापाºयाकडे थकीत असलेले ८२ लाख रुपये तत्काळ मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी मागणी केली. यावेळी माहिती देताना सभापती सोनवणे म्हणाले, संबंधित व्यापाºयाने शेतकºयांचे ३३ लाखरु पये अदा केले आहेत. उर्वरित रक्कम २४ सप्टेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती सभापतींनी दिली.यावेळी सभापती सोनवणे यांनी डांगसौंदाणे परिसरातील आदिवासी शेतकरी कळवण व पिंपळगाव बाजार समितीत माल विक्रीस घेऊन जात असल्याने डांगसौंदाणे येथे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार निर्मितीचा प्रस्ताव मांडल्यानंतर या प्रस्तावास अनेक शेतकºयांनी विरोध करताना सांगितले की, यापूर्वी सटाणा बाजार समितीतून कळवण तसेच नंतरच्या काळात नामपूर बाजार समितीचे विभाजन करण्यात आले. यामुळे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची सक्षमता कमी होत असल्याचे कारण दर्शवित उपस्थित शेतकºयांनी डांगसौंदाणे उपबाजार निर्मितीस विरोध केला. तसेच शेतकºयांना रोख स्वरूपात पाच ते दहा हजार रुपये देण्यात यावे यासाठी शासनाकडे मागणी करण्याची विनंती शेतकºयांनी केली.या चर्चेत मनोहर देवरे, अण्णा काशीराम सोनवणे, अरुण सोनवणे, विनायक पाटील, जयप्रकाश सोनवणे, पांडुरंग सोनवणे, भिकानाना सोनवणे, रमेश अहिरे, सुभाष अहिरे, लक्ष्मण सोनवणे, राहुल सोनवणे, संजय पवार, अरविंद सोनवणे, जिभाऊ सोनवणे, माधव सोनवणे, शरद सोनवणे, बबन सोनवणे आदींनी सहभाग घेतला.  सभेचे इतिवृत वाचन सचिव भास्कर तांबे यांनी केले.सभेस उपसभापती प्रभाकर रौंदळ, संजय देवरे, सरदासिंग जाधव,नरेंद्र अहीरे, संजय बिरारी, श्रीधर कोठावदे, प्रकाश देवरे, पंकज ठाकरे, केशव मांडवडे, ज्ञानेश्र्वर देवरे, तुकाराम देशमुख, मधुकर देवरे, संदिप साळे, रत्नमाला सुर्यवंशी मंगला सोनवणे, वेणुबाई माळी आदी संचालकांसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकºयांची अत्यल्प उपस्थिती

वार्षिक सर्वसाधारण सभेला शेतकºयांची अत्यल्प उपस्थिती होती. नामपूर बाजार समितीच्या खात्यावर समको बँकेने परस्पर १ कोटी रु पये कसे वर्ग केले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता या रकमेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात असल्याचे बँकेला कळविल्यानंतरदेखील सटाणा बाजार समितीला विश्वासात न घेता पैसे परस्पर वर्ग करण्याची कृती बँकेने केल्याचे स्पष्टीकरण सभापतींनी केले.