शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:38 IST

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.

ठळक मुद्देकोरोनात अवकाळी : घरांसह आंबा पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.२०५ हेक्टर आंबा भुईसपाटपेठ तालुक्यात गत पाच दहा वर्षांपासून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकरी केशर, हापूस, राजापुरी या अधिक उत्पादन देणाऱ्या आंबा फळांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. याही वर्षी कोरोना व लॉकडाऊन यामुळे हाताला काम नसल्याने किमान आंब्याच्या विक्रीतून तरी घरखर्च भागविला जाईल, अशी आशा असताना ऐन पक्वतेत आलेला आंबा भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार ९३ गावांतील १,४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले असून, तालुकास्तरीय यंत्रणेला पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.घरांसह शासकीय इमारतींची पडझडवादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये राहत्या घरांची पडझड झाल्याने कौले, लाकडे व संसारोपयोगी सामानाचे नुकसान झाले, तर हरणगाव, आसरबारी, आमडोंगरा, धुळघाट आदी गावांतील शाळा व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक जाणवली आहे. तालुक्यातील ६५ घरांचे वादळात अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली. 

टॅग्स :talukaतालुकाgram panchayatग्राम पंचायत