शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळींची साठवणूक क्षमता संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:23 IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देसंख्या वाढवावी : सभापतींचे कृषिमंत्र्यांना पत्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात सोमवारी बनकर यांनी भुसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशात अग्रस्थानी असून, कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्णात घेतले जाते.देशात सर्वसाधारणपणे ७.६० लाख हेक्टरवर कांदा पीक घेतले जाते. त्यापैकी जवळजवळ ३५ टक्के म्हणजे २.६६ लक्ष हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही फक्त नाशिक जिल्ह्यात केली जाते. त्यामधून सर्वसाधारण ६९ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी उन्हाळी लागवड केलेल्या कांद्याची फक्त साठवणूक केली जाते. साधारणपणे ५४ लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्णात होते. जिल्ह्यात विविध योजनांमधून उभारलेल्या व खासगी कांदा चाळींची संख्या जवळपास ५६३८६ इतकी आहे. त्यांची साठवण क्षमता साधारणपणे ११.७३ लाख मेट्रिक टन इतकी आहे.जिल्ह्यात उत्पादन होणाºया उर्वरित ४२.२७ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादनाचे साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणी लक्षांक वाढवून देण्यात यावे आणि त्याकरिता लागणारे वाढीव अनुदान देण्यात यावे जेणेकरून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना होईल, असे बनकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा