शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टेहर येथे कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:03 IST

मालेगाव : कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी व शासनाच्या कांदा विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतक-यांनी मुंडण करीत तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

मालेगाव : कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी व शासनाच्या कांदा विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतक-यांनी मुंडण करीत तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास खोळंबली होती.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कोसळले आहेत. अल्पदरात कांदा खरेदी केला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी कृती समितीच्या पदाधिका-यांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती. शनिवारी तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा स्मारका जवळ सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. कांद्याला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, कांद्याचे निर्यात धोरण निश्चित करावे, जनावरांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, निर्यातबंदी उठवावी यासह विविध मागण्यांप्रश्नी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. शासनाच्या कांदा विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शेतकºयांनी महामार्गावरच मुंडण केले. यावेळी कृती समितीचे अ‍ॅड. महेश पवार, डॉ. तुषार शेवाळे आदींसह कांदा उत्पादक शेतकºयांनी भाषणे केली.या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर संतप्त शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रांताधिकारी मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात कसमादे शेतकरी कृती समितीचे अ‍ॅड. पवार, जयेश अहिरे, अभिषेक पगार, अक्षय पवार, वैभव हिरे, आकाश भामरे, गणेश बच्छाव, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, टेहरेचे माजी सरपंच प्रभाकर शेवाळे, कृउबाचे माजी संचालक संदीप शेवाळे, पंचायत समितीचे सदस्य अरुण पाटील, मामकोचे संचालक राजेंद्र भोसले, दशरथ निकम, अ‍ॅड. चंद्रशेखर शेवाळे, अनिल शेवाळे, विनोद शेलार, अ‍ॅड. आर. के. बच्छाव, डॉ. जयंत पवार, कॉँग्रेसचे शांताराम लाठर, तालुकाध्यक्ष संदीप पवार, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, टेहरेचे माजी उपसरपंच अनिल शेवाळे, प्रा. के. एन. अहिरे, सुधीर चव्हाण, निखिल पवार, देवा पाटील, युवक कॉँग्रेसचे संदीप निकम, जयेश अहिरे, सचिन बेडसे आदिंसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक