शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:38 IST

निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देबंद यशस्वी कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध

निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपाला हिंदूंचे राज्य आणून जातीयवाद जन्माला घालायचा असल्याचा आरोप करून आमच्या सरकारच्या काळात उसाला २३०० रुपये भाव होता तो आज १६०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून, शेतकºयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर केले.यावेळी अनिल कुंदे, लासलगाव बाजार समिती संचालक सुभाष कराड, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, भीमराज काळे यांनीही आपल्या मनोगतातून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. याप्रसंगी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या निवेदनात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचा शेतकरीविरोधी प्रतिक्रियेवर कारवाई करावी, शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, डिझेलवर अनुदान मिळावे, बिबट्यांचा बंदोबस्त करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात राजेंद्र बोरगुडे, नगरसेवकदेवदत्त कापसे, वाल्मीक कापसे, बापूसाहेब कुंदे, जानकीराम धारराव, नंदू कापसे, कृष्णा नागरे, सहभागी झाले होते.४सकाळी १० वा शांतीनगर चौफुली येथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरी जमा झाले. लिलावासाठी आणलेले कांदे रस्त्यावर ओतले. नाशिक व येवला मार्गावर कांद्याचे ट्रॅक्टर, बैलगाडी आडवी लावण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे नाशिक, औरंगाबाद, पिंपळगाव बसवंतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १२ वाजेपर्यंत बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र निफाड बंदमुळे सकाळी आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीला आणला नाही. व्यापाºयांनी दुकाने लावली नाहीत आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी१२ नंतर आठवडे बाजार भरवण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmer strikeशेतकरी संप