शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निफाडसह विविध गावांत रास्ता रोको

By admin | Updated: June 6, 2017 02:10 IST

निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखवल्यामुळे सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखवल्यामुळे सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद यशस्वी झाला तर काही गावामध्ये रास्ता रोको, सरकारची प्रतीकात्मक प्रतिमा जाळणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे आदी मार्गाने आंदोलन करण्यात आले. निफाड येथे सर्वच पक्षांच्या वतीने निफाड शहरात बंद पाळण्यात आला. निफाडमधील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे कुठलेही व्यवहार होऊ शकले नाहीत.बंदमुळे शहरात दिवसभर शुकशुकाट होता. मेडिकल, दवाखाने, हॉस्पिटल या अत्यावश्यक सेवा चालू होत्या. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निफाड येथे शेतकरी आंदोलकांनी सकाळी ११ वाजता येथील शांतीनगर त्रिफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले़ या सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पोलिसांनी शेतकऱ्यांवर कांदे, कोंबड्या, अंडे चोरीचे गुन्हे लावले असून, हे गुन्हे पोलिसांनी ताबडतोब मागे घेण्याची मागणी कुंदे यांनी केली. अनिल कुंदे, विक्रम रंधवे, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, योगेश कुंदे आदींचीही भाषणे झाली. याप्रसंगी रमेश जेऊघाले, नगरसेवक देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, विनोद जोशी, सुरेश कापसे, बापू कुंदे, संजय धारराव, दीपक गाजरे, मोहन जाधव आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़