शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांकडून तोडणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 14:27 IST

औंदाणे- बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्यात सध्या टोमॅटोला घरातुन पैसे टाकुनही केवळ तीन ते चार रूपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.

औंदाणे- बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्यात सध्या टोमॅटोला घरातुन पैसे टाकुनही केवळ तीन ते चार रूपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामीण भागात औदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड, परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी ,दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदि गावातील शेतकºयांनी टोमॅटो चांगला बाजारभाव मिळेल,या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकचा खर्चसुद्धा निघत नाही. शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टोमॅटोला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रु पये खर्च करूनही आज टोमॅटो तीन-चार रु पये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही.त्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात विक्र ीसाठी नेली असता त्याचा खर्चसुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्ष टोमॅटो पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. पूर्वी नगदी पिक म्हणून टोमॅटो ओळखला जात होता. परंतु हल्ली कोणत्याही कारणाने टोमॅटो दर मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. तसेच काळजीही घ्यावी लागते. दर न मिळाल्याने मोठे कर्ज शेतकºयांच्या अंगाशी येते. टोमॅटो हा नाशवंत पिक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. तरी देखील परिसरातील बहुतेक शेतकºयांनी आपल्या टोमॅटो शेतात तोडणी बंद केली आहे.त्यामुळे शेतात टोमॅटो खच पडला असून शेत लाल दिसू लागले आहेत. शेतकºयांना पहिल्या हप्त्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसात कांद्याचेही बाजारभाव उतरल्याने कांद्याबरोबर टोमॅटो नेही शेतकर्यांना रडवले.कोणत्याही पिकला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आणखीच अडचणीत सापडला आहे.आत्ता शेती करायची तरी कशी आणि पिक घ्यावे तरी काय असा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक