शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीला  अखेर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:38 IST

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी झालेल्या विशेष महासभेत उमटले. पालिका मुख्यालयाबाहेर सर्व पक्षांसह नागरिकांकडून आंदोलन होत असतानाच सभागृहातही सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शविला. यावेळी महापौरांनी करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा ...

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी झालेल्या विशेष महासभेत उमटले. पालिका मुख्यालयाबाहेर सर्व पक्षांसह नागरिकांकडून आंदोलन होत असतानाच सभागृहातही सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शविला. यावेळी महापौरांनी करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर अव्वाच्या सव्वा कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात ठिकठिकाणी असंतोष प्रकट होत आहे. या निर्णयाच्या विरोधात सोमवारी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.महासभेत नऊ तास वादळी चर्चाआयुक्तांनी स्थायी समिती व महासभेला डावलून एकतर्फी करवाढीचा निर्णय घेतल्याने विशेष महासभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या या निर्णयाचा तिखट शब्दांत समाचार घेतला. यावेळी आयुक्तांवर मनमानी कारभाराचा व हिटलरशाहीचाही आरोप करण्यात आला. सुमारे ९ तास चाललेल्या या महासभेत आयुक्तविरोधी सूर उमटला.आयुक्त अडचणीत येण्याची शक्यताप्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक सुरू असताना करवाढीचा अध्यादेश जारी केल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी माजी आयुक्त संजय खंदारे यांची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बदली झाल्याचे स्मरणही करून देण्यात आले. त्याप्रमाणेच मुंढे यांची तक्रार आयोगाकडे करण्याची मागणी झाल्याने आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका