शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:14 IST

देवळा : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी सोमवारी (दि.२४) तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार नदीपात्रालगत असणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंद घालण्यात आला. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देदेवळा : तहसीलदारांच्या आदेशानंतर केली कारवाई

देवळा : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी सोमवारी (दि.२४) तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार नदीपात्रालगत असणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंद घालण्यात आला. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे.तालुक्यातील विठेवाडी, लोहोणेर आदी गावांत गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार विठेवाडी येथील नागरिकांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी त्यांच्याकडे केली होती. महसूल विभागाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले व तातडीने कारवाई करून नदीपात्रातून वाळूची चोरी केली जाते, त्याठिकाणी जाण्याच्या मार्गावरील रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने चाऱ्या खोदण्यात आल्या. यापूर्वी देखील महसूल विभागाने अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी अनेक वेळा कारवाई केली होती, परंतु ती औटघटकेची ठरल्यामुळे नागरिकांची निराशा झाली होती. या वेळची कारवाई तात्पुरती न ठरता दीर्घकालीन राहील व महसूल विभाग सातत्याने त्याचा पाठपुरावा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.इन्फोतहसीलदारांना भेटले शिष्टमंडळअनेक दिवसांपासून गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. याची तक्रार करून देखील महसूल व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत विठेवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती. सोमवारी गावातील शिष्टमंडळाने तहसीलदार सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर पायबंद घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन तहसीलदारांनी नदीपात्रातून वाळू वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदण्याची कारवाई केली. 

टॅग्स :GovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी