पिंपळगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:25 PM2020-01-19T22:25:50+5:302020-01-20T00:16:22+5:30

सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.

Stop the road at Pimpalgaon | पिंपळगाव येथे रास्ता रोको

पिंपळगाव बसवंत येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी संतोष अहिरराव, उद्धवराजे शिंदे, माणिक शिंदे, स्नेहा गायकवाड व अंबिकानगर परिसरातील नागरिक.

googlenewsNext
ठळक मुद्देसंताप : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने; धुळीचे साम्राज्याने आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.
या रस्त्याच्या कामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. अनेकवेळा रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली असता याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धुळीचे साम्राज्य व कामामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे, या सर्व हानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या अथवा पुलाचे काम केले आहे. त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे.
मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. धुळीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारास काम काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

अगोदरच अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच थंडीनेदेखील उपद्रव होत असतानाच, आता धुळीचा त्रास वाढल्याने पिकांसह शेतकऱ्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी मार्गी लागेल याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया उद्धवराजे शिंदे, माणिक शिंदे, स्नेहा गायकवाड व आंदोलकांनी यावेळी दिली.

श्वसनाची क्षमता होतेय कमी
रस्त्याच्या कामामुळे उडणारी धूळ श्वासातून शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अ‍ॅलर्जीचा त्रास असणाºयांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घसा दुखीचे आजार जडले आहेत, तर अनेकांची श्वसन क्षमता कमी होत असल्याने रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची
अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Stop the road at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप