शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:39 IST

: नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.  सिन्नर सोनांबे येथील हिराबाई बाळासाहेब वारुंगसे (४५) या गुरुवारी सायंकाळी मुलासोबत मोटारसायकलवरून पळसे येथे कामानिमित्त आल्या होत्या. सायंकाळी ६.३० च्या सुमारास सर्व्हिसरोडवरून पळसे चौफुलीवर महामार्गावर मोटारसायकल जात असताना सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा मालट्रक (एमएच १५ बीजी ९१५१) हिने मोटारसायकल (एमएच १५ एआर ५७६५) हिला जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून हौशाबाई वारुंगसे जागीच ठार झाल्या. या भीषण अपघातामुळे येणारे-जाणारे व बघणारेदेखील घाबरून गेले होते.  अपघात व रास्ता रोकोची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन जोपर्यंत गतिरोधक टाकण्याबाबत स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. ढोकणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी फोनवरून बोलून त्यांना घटनास्थळी बोलविले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पळसे ग्रामस्थांना शुक्रवारी गतिरोधक टाकण्याचे आश्वासन देत लेखीदेखील लिहून दिले. त्यानंतर एक-दीड तासाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर हळूहळू अर्ध्या तासाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षपळसे कमानीजवळील चौफुलीवरील महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात. त्या ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी अनेक दिवसांची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुला अचानक ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा