शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:29 IST

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनामपूर : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.देशभरात शेतकºयांच्या सुमारे १३२ संघटनांनी एकत्र येऊन १ जूनपासून शेतमाल विक्रीवर बहिष्कार टाकून शेतकरी संप पुकारला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पगार यांच्या नेतृत्वाखाली नामपूरला बाजार समिती समोर रास्ता रोको करण्यात आले. याप्रसंगी पगार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर टीका केली. सत्ताधारी भाजपा सरकार शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. खोट्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. येत्या दोन दिवसात जर शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक पगार यांनी यावेळी दिल. याप्रसंगी प्रहार संघटनेचे नाना भाऊ सावंत, रा. कॉँचे शशिकांत कोर, सम्राट काकडे, नितीन काकडे , बी. एस. भामरे, शेतकरी संघटनेचे प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, समीर सावंत, भिका धोंडगे, विनोद पाटील, हेमंत कोर, डोंगर पगार, सचिन कापडनीस यांनी तीव्र शब्दात शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, दुधाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, नुकसानीचे पंचनामे झाल्यावर तत्काळ भरपाई मिळाली पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, चालू महिन्यात खरीप हंगामात पीककर्ज मिळाले पाहिजे, बँकांनी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक धिवरे, पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक विजय गावित , मंडल अधिकारी सी. पी. अहिरे यांना देण्यात आले. आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा व दंगानियंत्रण पथक नामपूर शहरात दाखल झाले होते. रास्ता रोकोमुळे सुमारे दोन तास मालेगाव-ताहाराबाद रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नामपूर परिसरातील शेतकºयांच्या भावनांचे निवेदन मिळाले असून, शासनस्तरावर लवकरच अहवाल पाठवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा.- दीपक धिवरेनायब तहसीलदार, सटाणा

पोलीस बंदोबस्तात दूध टॅँकर रवाना

लासलगाव : विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेल्याने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव येथून पोलीस बंदोबस्तात दुधाचा टॅँकर रवाना करण्यात आला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात संकटात सापडलेल्या बळीराजाने विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील नागरिकांची रसद थांबविण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची कमतरता भासू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊ केल्याने त्याचा फायदा लासलगाव येथील एका दूध संकलन केंद्राच्या संचालकाने घेत पोलीस बंदोबस्तात वीस हजार लिटर दूध सुरत येथील डेअरीसाठी पाठवले. हे दूध डेअरीत पोहोचल्यानंतर पॅकिंग करून दूध मुंबईसाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती दूध संकलन केंद्राचे संचालक दत्ता क्षीरसागर यांनी दिली .