शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

थांब लक्ष्मी कुंकू लावते,

By admin | Updated: September 26, 2015 23:16 IST

येवल्याच्या पैठणीचा अहेर करते!

बाईसाहबाला शिवीन म्हटलं चोळीपन शिंप्याची बंद झाली आळीमी काय चोळीसिवन्याजोगी नव्हती व्हई?एकनाथी भारुडातली ही बाईसाब म्हणजे नणंद. नणंद म्हटलं की अत्यंत खाष्ट आणि कजाग बाई. किती खाष्ट आणि किती भांडकुदळ, तर‘नंदेचं कार्ट किरकीर करतंयखरुज होऊ दे त्यालाभवानी आई रोडगा व्हाईन तुला’पण सगळ्या नणंदा अशा खाष्ट नसतात आणि भावजयादेखील एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे डांबीस आणि लबाड नसतात. काही नणंदा म्हणजे मूर्तीमंत ‘आनंद’ आणि भावजया तर साक्षात ‘देव्याच’. देव दिनाघरी धावला असं काहीसं भगवंत आणि सुदाम्याविषयी म्हणतात म्हणे. पण इथे तर साक्षात आनंदमूर्तीच देवीघरी धावली. तीदेखील बहुधा नणंदेच्या रुपात आणि तेही माहेरपणाला. माहेरपणाला आलेल्या माहेरवासणीला दोन दिवस थांबवून घेणं, तिला गोडाधडाचं खाऊ घालणं आणि तिची सासरी पाठविताना खण-नारळ, चोळी-बांगडी किंवा जे काही ऐपतीत बसेल आणि परवडेल ते देऊन तिचा आदर सत्कार करणं देवीस्वरुप भावजयीचं कर्तव्य ठरतं. सगळ्याच नणंदा आणि साऱ्याच भावजया एकनाथांना गवसल्या तशा नसतात.पण भावजयी देवीस्वरुप झाली म्हणून काय झालं? ऐपतही रग्गड असली म्हणून काय झालं? परवडण्या बिरवड्याण्याचा प्रश्न नसला म्हणून काय झालं? अखेर भावजयी पडली बाईमाणूस. तिची तर नणंद माहेरपणाला आलेली. पण तिच्या भावांची तर साक्षात जिवाभावाची बहीण माहेरपणाला आलेली. मग त्यांचे काही कर्तव्य आहे की नाही?त्यातून ते सारे म्हणजे काही,निस्ती कळण्याची भाकर अन आंबाड्याची भाजीखाणारे नव्हत!एकसे एक सारे तालेवार. कुणी शेतसारा वसूल करणारे, कुणी चोरा-चिलटांचा बंदोबस्त करणारे, कुणी ब्यँकांचा बंदोबस्त करणारे, तर कुणी काय अन कुणी काय. खरं तर त्यानी साऱ्यानी आपणहून पुढे व्हायचं. बहिणीला काय हवं काय नको हे विचारायचं. बाई तुला माहेरची ईरकल हवी, येवल्याची पैठणी हवी, सराफाकडचा एखादा डाग हवा का आणखी काय हवं, हे नुसतं विचारायचं नाही, तर आणून तिच्या ओच्यात ओटी म्हणून टाकायचं. पण कसचं काय आन फाटक्यात पाय. पण म्हणतात ना, गुराख्यानं सोडलं म्हणजे मालकाला सोडून चालत नाही. लाज देवीस्वरुप भावजयीलाच वाटली. नणंदेचा आदर सत्कार करु, तिची चांगली पाठवणी करु म्हणजे ती तिच्या सासरी जाऊन आपलं कौतीक करील आणि उद्या तिच्याकडंच जायचं वेळ आली तर एक पाट सात ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असा भला विचार करुन भावजयीनी आपल्या साऱ्या दिरांना कामाला लावलं. एकेकाला एकेक जिन्नस नेमून दिला. खनपटी बसून तो त्यांच्याकडून आणवून घेतला. पण तरीही ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ म्हणणाऱ्या या बिलंदर भावांची कुरकर सुरुच. एकनाथांना जर हे समजलं असतं तर ते लगेच म्हणाले असते,नंदेची भाचरं कुरकुर करत्यातपटकी होऊं दे त्यानाआनंदीबाई पैठणी नेसवीन तुला