शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुका दुष्काळी जाहिर करून सक्तीची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:51 IST

येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र योग्य असा पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचवीस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटनचे निवेदन : रोहित्र बंद करण्याची मोहीमेमुळे आक्रमक

येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र योग्य असा पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचवीस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे.शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी भरमसाठ खर्च करून भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला तरी मायबाप सरकार मुग गिळून गप्प बसले असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.पावसाळ्यात येवले तालुक्यात २९ गाव आणि १९ वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालु आहेत. पालखेड डाव्या कालव्यावरील ओव्हर फ्लोच्या रोटेशनमुळे पंधरा वीस टक्के भागात नदीवरील बंधारे भरून दिले असले तरी ते पाणी एक महिन्याच्यावर पिकांना जीवदान देऊ शकत नाहीत.शेतकºयांच्या वस्तीवर पिण्यासाठी व जनावरांसाठी बोअरवेल शिवाय पाण्याची सोय नाही. मात्र विज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची मोहीम हाती घेऊन शेतकºयांना जगणे मुश्किल केले आहे. या मोहिमेविरोधात शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदन मंगळवारी शेतकरी संघटनेने येवला उप विभागीय अधिकारी दराडे, तहसिलदार वारूळे, आमदार छगन भूजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे तसेच भाजप तालुका अध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष यांना देण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. दुष्काळाच्या सुविधा तालुक्यातील जनतेला मिळवून द्याव्यात. बील वसुली, बॅन्केची कर्ज वसुली त्वरित थांबवा, कांद्याला किमान दोन हजार भाव जाहीर करून शेतकºयांने विकलेल्या कांद्याची फरकाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करावी, टोमॅटोसाठी पाकिस्तान, बांगलादेश बॉर्डर खूली करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या देशात त्यांचा कांदा,साखर, आंबा येऊ शकतो मग आपले टोमॅटो का पाठवत नाही? कांदा पिकाला उत्पादन खर्चावर अधारित रास्त भाव मिळण्यासाठी आयात निर्यात धोरणात सातत्य राखून नविन बाजार शोधून संबंधित देशांशी करार करावे, कायद्याला किमान दोन हजार रु पये क्विंटल भाव द्यावा आदी मागण्या आहेत.शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुकाध्यक्ष अरूण जाधव, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश सोमवंशी, बापूसाहेब पगारे, जाफर पठाण, बाळासाहेब गायकवाड, अनिस पटेल, सुभाष सोनवणे, शंकर पुरकर, दत्तात्रय मोगल, दत्तु सादडे, सुरेश जेजूरकर, भगवान बोराडे, सतिश जगझाप, जयराम वर्पे, वसंत पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक