शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Updated: November 26, 2015 22:11 IST

पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

आझादनगर : मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाची पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यापूर्वी बुधवारी (दि. २५) सकाळपासून गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी आवर्तन सोडण्यात आले याचा निषेध म्हणून आज महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार आसिफ शेख यांनी रास्ता रोको आंदोलन केले.मालेगावकरांना ८०० दलघफू पैकी फक्त १५० दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. मालेगाव शहराची लोकसंख्या सात लाख ३० हजार आजमितीस आहे. गिरीश महाजन यांनी मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातून ४०० दलघफू पाणी आरक्षित करण्याचे आश्वासन आमदार आसिफ शेख यांना दिले होते. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वीच व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करताच बुधवारी सकाळी ६ वाजेपासून गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत मालेगाव शहरास गिरणा धरणातून पाणी आरक्षणाबाबत लेखी स्वरूपात आदेश होत नाही तोपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर तथा स्थायी समिती सभापती ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक विठ्ठल बर्वे, असलम अन्सारी, गटनेता हाजी खालीद शेख, एजाज वजीर, अ‍ॅड. हिदायतउल्ला अन्सारी, मौलाना जाहीद नदवी, मौलाना अय्युब कासमी, नगरसेविका फातमा मो. हारुण, यास्मीन कलीम अहमद, कमरुन्निसा मो. रिजवान, फरिदा खान, सायरा असलम खान, शकीला एकबाल अहमद यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)