शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

येवल्यात सीएए कायद्याच्या विरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:58 PM

लोकविरोधी धोरणांपासून देशाला वाचविण्यासाठी व सीएए, एनआरसी कायद्यास विरोध करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, कामगार युनियन व डाव्या चळवळीच्या संघटनांच्या वतीने येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिदर्शने : वंचित बहुजन आघाडी, भारिप, कामगार युनियनचे तहसीलदारांना निवेदन

येवला : लोकविरोधी धोरणांपासून देशाला वाचविण्यासाठी व सीएए, एनआरसी कायद्यास विरोध करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, कामगार युनियन व डाव्या चळवळीच्या संघटनांच्या वतीने येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.भारिपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. खर्च चालविण्यासाठी लागणारा निधी नसल्यामुळे सरकारने देशाच्या राखीव पुंजीला हात घातला आहे. खासगी उद्योग नफ्यात चाललेले आहे. भारतीय उद्योग खासगी व परदेशी भांडवलदारांना विकायला काढले आहेत. तसेच सीएए, एनआरसी, एनपीआर यांसारखे संविधानविरोधी कायदे व धोरणांची घोषणा सरकारने केलेली आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची मागणी सरकार करत आहे. देशातील हिंदू-मुस्लीम, आदिवासी, दलित, भटके-विमुक्त पोटासाठी भटकणारी स्थलांतरित अशा ४० टक्के नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यांच्याकडून भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व व समान अधिकार काढून घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आक्र ोश निर्माण झाला आहे. यावर उपाययोजनेची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रास्ता रोको आंदोलनात विनोद गोतीस, संतोष जोंधळे, पोपट खंडांगळे, जितेश पगारे, आकाश पडवळ, सविता धिवर, रेखा साबळे, अक्षय कर्डक, दयानंद जाधव, शरद अहिरे, समाधान धिवर, आनंद शिंदे, कुणाल निंदाने, शेख सलील, गौतम घोडेराव, संकेत घोडेराव आदी सहभागी झाले होते.इगतपुरी येथे व्यावसायिकांनी पाळला कडकडीत बंदइगतपुरी : सीएए कायदास विरोध दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला सर्व स्तरातील व्यावसयिकांनी प्रतिसाद देत शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळला. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्र म जगताप, शहराध्यक्ष सचिन चोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. युवा तालुकाध्यक्ष किशोर भडांगे, ज्येष्ठ नेते नंदू पगारे, शहर उपाध्यक्ष आनंद देहाडे, महिला तालुकाध्यक्ष अर्पिता रुपवते, रंजना साबळे, सुरेखा मोरे, करुणा बर्वे, महेश पगारे, अमोल जगताप, मनोज मोरे, कांतीलाल गरुड, अविनाश तेलोरे, गजेंद्र बर्वे, भूषण पंडित आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप