शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाडा पोलीस पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:58 IST

फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाकरिता गणेशवाडीच्या शेरीमळा येथे कारवाईसाठी पोहचलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

पंचवटी : फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाकरिता गणेशवाडीच्या शेरीमळा येथे कारवाईसाठी पोहचलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक बैरागी यांच्याकडे एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास होता. या गुन्ह्याबाबत कारवाई करण्यासाठी बैरागी हे पथकासह शेरीमळ्यात पोहचले होते. यावेळी काही महिला व तरुणांनी पोलीस पथकावर दगडफेक करत हल्ला चढविला. यावेळी संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. याबाबत बैरागी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. तपासासाठी रविवारी बैरागी हे पोलीस कर्मचारी बागडे, पळशीकर व कुटे यांच्यासमवेत पोलीस वाहन क्र मांक (एम.एच१५ ई.ई २४८) गणेशवाडीतील शेरीमळ्यात दुपारी गेले होते. तेथे चौकशी सुरू असताना जमलेल्या जमावापैकी संशियत पुंडलिक गोविंद उशीर, संदीप मधुकर पगारे, गुलाब तरळ, मोहन उशीर, संजय पाटील, गौरव उशीर, सुनील सोळसे, गुलाबबाई चव्हाण, बेबी गरड व अन्य संशयितांनी गर्दी केली. त्याचवेळी मोहन उशीर याने पोलिसांवर दगडफेक करून पोलीस वाहनाची काच फोडली, नंतर संजय पाटील याने बैरागी व कर्नावट यांना हाताला मारहाण करून अंगावर काचकुयरी फेकून जिवे मारण्याची धमकी दिली.तणाव निर्माण झाल्याने बंदोबस्तात वाढपरिसरात मोठा जमाव जमल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्त तैनात करण्यात आला.