शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:32 IST

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.

ठळक मुद्देतणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली नाशिक : अतिक्रमण मोहिमेला गालबोट

अतिक्रमण पथकावर दगडफेक करणाºया जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नानावली परिसरात शांतता पसरली. जमावाच्या धावपळीत रस्त्यावर चपला आणि दगड पडलेले होते. 

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने दि. ८ नोव्हेंबरपासून रस्त्यांवर अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. सिडको, सातपूर, पश्चिम आणि पंचवटी विभागातील सुमारे दीडशे अनधिकृत धार्मिक स्थळे किरकोळ विरोध वगळता शांततेच्या वातावरणात जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, पूर्व विभागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधी संबंधित विश्वस्तांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली गेल्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.१६) सदर अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने मुंबई नाका परिसरातील धार्मिक स्थळापासून कारवाईला प्रारंभ केला. त्यानंतर संवेदनशील समजल्या जाणाºया भारतनगरमधील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम परिसरातील तरुणांनी स्वत:हून काढून घेतले.महापालिकेचे पथक पोहोचेपर्यंत निम्म्याहून अधिक बांधकाम काढून घेण्यात आले होते. धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका बजावली.तासाभरात परिस्थिती नियंत्रणात नानावलीमधील धार्मिक स्थळाच्या आवारात महिला भाविकांनी ठिय्या देत विरोध दर्शविल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील धार्मिक स्थळ हटविण्यासाठी अतिक्रमण पथक दाखल होताच महिलांनी आक्रोश सुरू केला. त्यामुळे वातावरण तापल्याने जमावाला शांत करण्यासाठी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना आसिफ इकबाल, मीर मुख्तार अशरफी यांनी ध्वनिक्षेपकांवरुन आवाहन सुरू केल. मात्र काही समाजकंटकांनी पथकावर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांचा पुरेसा फौजफाटा असल्याने अवघ्या तासाभरात परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.धर्मगुरूंकडून जमावाचे प्रबोधनमहापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर भारतनगर परिसरात काहीकाळ तणावाची स्थिती होती. यावेळी धर्मगुरूंनी घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमावाला कायदा आणि न्यायालयाचा आदेश समजावून सांगितला आणि त्यांचे प्रबोधनही केले. जुन्या नाशकातील नानावली परिसरातही तणावाची स्थिती बनल्याने धर्मगुरूंनी उपस्थित जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या जमावात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता.दोन पोलीस कर्मचाºयांसहएकजण जखमीनानावलीचे धार्मिक स्थळ हटविताना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस अधिकाºयासह कर्मचारी व एक नागरिक जखमी झाले आहेत. दोन पोलीस वाहनांसह अग्निशामक दलाच्या वाहनाचीही काच फुटली. जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. दंगल नियंत्रण पथकाने जमावावर लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी जमावाने पळ काढतरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी पाडून देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तणावपूर्ण वातावरणात कार्यवाही पार पडली.नानावलीत दगडफेकीमुळे काहीकाळ तणाव न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ‘त्या’ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध पालिकेने गुरूवारी मोहीम हाती घेतली. सकाळी मोहिमेला शांततेत सुरूवात झाली; मात्र नानावली भागात दगडफेकीमुळे गालबोट लागले. सकाळपासून धर्मगुरूंकडून शांततेचे आवाहन केले जात होते. त्यामुळे सहाही धार्मिक स्थळांवरील कार्यवाही शांततेत पूर्ण झाली. बहुतांश भागात स्थानिकांनी पुढाकार घेत धार्मिक स्थळांचे बांधकाम काढून घेतले; मात्र अखेरचे सातवे धार्मिक स्थळ हटविताना दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.