शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या बहाण्याने वृद्धेची पोत चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:26 IST

अस्वस्थ वाटू लागल्याने आराम करीत असलेल्या वृद्धेस मदत करीत असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़ १) सायंकाळी सिडकोतील राणेनगरमध्ये घडली़

नाशिक : अस्वस्थ वाटू लागल्याने आराम करीत असलेल्या वृद्धेस मदत करीत असल्याचे भासवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़ १) सायंकाळी सिडकोतील राणेनगरमध्ये घडली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकानंदनगरमधील रहिवासी मथुराबाई धर्मा पाटील या सायंकाळी घरासमोरील पाचोळा गोळा करून कुंडीत टाकण्याचे काम करीत होत्या़ कचरा टाकून परतत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्या दत्तमंदिराच्या पायºयांवर बसल्या़  मथुराबाई धर्मा पाटील (७१, रा. विवेकानंदनगर, राणेनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मथुराबाई बुधवारी सायंकाळी घरासमोरील पालापाचोळा गोळा करून परिसरातील कचराकुंडीत टाकण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. कचरा टाकून परतत असताना अचानक चक्कर आल्याने त्या नजीकच्या दत्तमंदिराच्या पायºयांवर बसल्या असता परिसरातील महिला व नागरिकांनी त्यांना मदत केली़ या मदत करणाºयांमध्ये असलेल्या एका भामट्याने मदतीचा बहाणा करीत पाटील यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत काढून घेतली़ या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोन्याच्या बांगड्या पळविल्या विवाहितेस भुरळ घालून तिच्या हातातील लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या एका भामट्याने काढून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास पेठरोड परिसरातील नवरंग मंगल कार्यालयाजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशर प्लाझामधील रहिवासी प्रिया प्रीतेश बोरा (३२) या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकट्या होत्या़ यावेळी घराची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता एका संशयित तरुणाने शेजाºयाची विचारपूस करण्याच्या बहाण्याने बोरा यांना संमोहित केले़ या युवकाने संमोहन केल्याने बोरा यांनी आपल्या हातातील ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या उतरवून या युवकाच्या ताब्यात दिल्यानंतर युवक पसार झाला़ बोरा यांच्यावरील असर कमी झाल्यानंतर तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़