शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही परिस्थिती जैसे थे प्रश्न

By admin | Updated: August 6, 2016 00:48 IST

आरोग्याचा : तातडीने सफाई न झाल्यास साथीचे रोग बळावण्याची भीती

नाशिक : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून अजूनही शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी (दि. ४) पावसाने विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. शहरातील पंचवटी, सराफ बाजार, भांडी बाजार, गोदापार्क या परिसराचे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही व्यावसायिकांचे जीवन पूर्वपदावर न आल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.सराफ बाजारातील काही सराफांनी व्यवसायाला सुरुवात केली असली तरी दुकानांतील शोकेसमध्ये दागिने लावण्यात आलेले नाहीत, ग्राहकांचाही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने छोट्या प्रमाणातच सराफ व्यावसायिक व्यवसाय करताना दिसत होते. अनेक सराफ दुकानांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या फर्निचरची योग्य मांडणी सुरू होती तर काही दुकानांमध्ये पाण्याच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम शुक्रवारीही दिसत होते. दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता करीत असले तरी दुकानातील गाळ तसेच साचलेला कचरा दुकाना बाहेर फेकत असल्याने या परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सराफ बाजारातील रस्ते अरूंद असल्याने याठिकाणी जेसीबी किंवा तत्सम उपकरणांच्या साहाय्याने स्वच्छता करणे शक्य होत नसल्याने व्यावसायिकच याठिकाणी स्वच्छता करत आहेत.सराफ बाजारापेक्षाही भांडीबाजार परिसराची वाईट अवस्था झाली असून अजूनही येथे गाळ तसाच साचला आहे. भांडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये दुकानातील गाळ उपसण्याचे आणि दुकानातील भांडी स्वच्छ करण्याचे काम सुरूच आहे. या परिसरात कापड व्यावसायिकांची- देखील दुकाने असून पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या कपड्यांचा खच दुकानांबाहेर पडल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. पुराच्या पाण्यामुळे दुकानातील वस्तू खराब झाल्याने व्यावसायिकांकडून खराब झालेल्या वस्तूंची स्वस्तात विक्री सुरू असल्याने या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजा तसेच पुढील महिन्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पूजेसाठी लागणारी भांडी, इतर उपकरणे यासह चौरंगाची खरेदी करताना ग्राहक दिसत होते. भांडी बाजारात टपऱ्या वाहून आल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांना अरूंद वाटेतून चालणे मुश्कील झाले आहे. पोटरीपर्यंत साचलेल्या गाळातून कशीबशी वाट काढताना नागरिक दिसत होते. याठिकाणीही प्लॅस्टिक, पुठ्ठे आदि कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.