शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेप राइडर उपकरणाची जिल्हास्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:50 IST

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने सादर केलेल्या स्टेप राईडर या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. २००९ पासून सलग दहा वर्षे या विद्यालयाचे उपकरण जिल्हास्तरावर निवड होत असल्याने वडांगळी विद्यालयाने नवा उच्चांक केला आहे. या यशाबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने सादर केलेल्या स्टेप राईडर या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. २००९ पासून सलग दहा वर्षे या विद्यालयाचे उपकरण जिल्हास्तरावर निवड होत असल्याने वडांगळी विद्यालयाने नवा उच्चांक केला आहे. या यशाबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.तालुक्याचे ४४ वे विज्ञान प्रदर्शन प्रवरा टेक्निकल कॉलेज चिंचोली येथे पार पडले. प्रदर्शनात वडांगळी विद्यालयाने स्टेप इन हे उपकरण सादर केले होते. हे उपकरण बहुमजली इमारतीवर अवजड सामान वाहून नेण्यासाठी उपयोगी आहे. उपकरण बनविण्यासाठी जुन्या साईकलचे व्हील, लोखंडी पाईप, बेरिंग, वापरण्यात येऊन अवघ्या दोनशे ते तीनशे रूपये खर्च आला.विद्यालयातील विद्यार्थी सिद्धार्थ कुलथे, आयुष आहिराव, रोहित गीते या विद्यार्थ्यांनी सदर उपकरण बनविले. विज्ञान शिक्षक कल्पेश चव्हाण, मधुकर बागुल, टी. पी. सानप, जी. एस. कोरडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी उपकरण पाहून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. नगर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी राजीव लहामगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाच्या या उपकरणाला बक्षीस प्रदान करण्यात आले. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या या उपकरणाच्या यशाबद्दल मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, सुदेश खुळे, मुख्याध्यापक के. एस. नवले व पर्यवेक्षक भरत कडलक आदींनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

टॅग्स :Studentविद्यार्थी