शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी सावत्र बापास जन्मठेप

By admin | Updated: March 24, 2015 00:24 IST

आईस सक्तमजुरी : श्रीरंगनगरमधील २०१३ मधील घटना

नाशिक : अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून छळ करणाऱ्या सावत्र बापास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी सोमवारी (दि़२३) जन्मठेपेची, तर गुन्हा लपविण्यासाठी पतीला मदत करणाऱ्या पीडित मुलीच्या आईस दहा वर्षे सक्तमजुरी शिक्षा ठोठावली़ सागर राठी व आशा राठी अशी या मुलीच्या आईवडिलांची नावे आहेत़ गंगापूररोडवरील श्रीरंगनगरमध्ये आॅक्टोबर २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आई आशा हिचा सागर राठीसोबत दुसरा विवाह झाल्यानंतर हे दोघेही पीडित मुलीसोबत गंगापूर रोडवरील श्रीरंगनगर परिसरात राहत होते़ आशा ही धुणीभांडीच्या कामाला गेल्यानंतर आरोपी सागर राठीने बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते़ दरम्यान, आशा राठी ही गर्भवती असल्याने ती मुलीला घराजवळ राहणाऱ्या सुनंदा पवार यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवीत असे़ या मुलीस आंघोळ घालताना पवार यांना तिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा दिसल्या. या मुलीस जखमांबद्दल विचारणा केली असता सावत्र वडील सागर राठी याने लैंगिक अत्याचार व मारहाण केल्याचे सांगितले़ यानंतर पवार यांनी याबाबत मुलीची आई आशा राठी हीस सांगितले, मात्र तिने पोलिसांत कोणतीही तक्रार न देता पती सागरला वाचविण्याचा प्रयत्न केला. अखेर पवार यांनीच सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत सागर राठी आणि आशा राठी या दोघांविरोधात आॅक्टोबर २०१३ मध्ये फिर्याद दिली़ या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपाराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली़हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील अ‍ॅड़ सुप्रिया गोरे यांनी सात साक्षीदार तपासून पुरावे सादर केले़ त्यानुसार आरोपी सागर राठी यास जन्मठेप, तर आशा राठी हीस दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)