शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:52 IST

पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.

पळसन जवळील सातशे लोकसंख्या असलेले पायरपाडा हे गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून पुरात नार नदी ओलांडून जावे लागत आहे. हा प्रकार दर पावसाळ्यात दिसून येतो. त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. पळसन व पायरपाडा दरम्यान कोणताही पूल नसल्याने पावसाळ्यात ही गंभीर समस्या निर्माण होते. याबाबत जूनीमागणी असूनही दूर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, हा जीवघेणा खेळ सुरू होतो. लोकप्रतिनिधींपर्यंत आवाज पोहचत नाही हे मोठे दुर्भाग्य असल्याची जनभावना आहे. पावसाळा संपेपर्यंत काही नागरिक पळसनमध्ये ओळखीच्या ठिकाणी दूचाकी वाहने ठेवतात. म्हणजे नार नदी ओलांडून पळसनला यायचे, तेथून दूचाकी किंवा अन्य वाहनाने तालुक्याला यायचे. कामे उरकून पळसनला परत जावून संध्याकाळी पुन्हा नदीपात्र ओलांडून पायरपाड्याला जायचे. पावसाळा संपून जेव्हा नदीपात्र कोरडे होते, त्यावेळी उर्वरित आठ - नऊ महिने या नार नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने ये - जा करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर तिला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पोहणाऱ्याला शोधून नार नदी पार करून द्या अशी विनंती करावी लागते. पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रु ग्णांना डोली करून आणणेही कठीण झाले आहे.नार नदी पात्रातून चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जावे यावे लागते. नागरिकांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. स्वातंत्र्य काळापासून पायरपाडा गावाची अशीच परिस्थिती आहे. मोठ्या पूलाची मागणी लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली मात्र दुर्लक्ष होत आहे.- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पळसन.

टॅग्स :floodपूरriverनदी