शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा बॅँकेच्या बरखास्तीला न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:44 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सहकार अधिनियम ११० अ अन्वये सहकार खात्याने २९ डिसेंबर रोजी रात्री बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली होती. त्यात प्रामुख्याने सन २०१५ व २०१६ या दोन वर्षांत बॅँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे बॅँकेचे

ठळक मुद्देसंचालकांना सदस्यत्व बहाल : सहकार विभागाला झटका शुक्रवारपासून कामकाज सुरू करण्याचे जाहीर

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, विद्यमान संचालकांचे सदस्यत्व बहाल करण्याचा व त्यांना बॅँकेचे कामकाज पाहण्याची मुभाही दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सहकार खात्याला मोठा झटका मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे संचालक मंडळाने स्वागत करून शुक्रवारपासून कामकाज सुरू करण्याचे जाहीर केले आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सहकार अधिनियम ११० अ अन्वये सहकार खात्याने २९ डिसेंबर रोजी रात्री बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली होती. त्यात प्रामुख्याने सन २०१५ व २०१६ या दोन वर्षांत बॅँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे बॅँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे तसेच वसुलीअभावी बॅँकेचा एनपीए वाढल्याचा अहवाल नाबार्डने दिला होता. त्याच आधारावर राज्य सरकारने गेल्या जून महिन्यातच बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबतचे पत्र रिझर्व्ह बॅँकेला पाठविले होते. मात्र रिझर्व्ह बॅँकेला ही कारवाई करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या आदल्या दिवशीच सहकार निबंधकांनी बॅँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांवर निश्चित करून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर लगेचच झालेल्या या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.सहकार खात्याच्या या कारवाईच्या विरोधात बॅँकेच्या संचालक मंडळाने गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले होते. त्याची सुनावणी मंगळवारी दुपारी न्यायमूर्ती धनुका यांच्यासमोर करण्यात आली. यावेळी संचालकांच्या वतीने अ‍ॅड. रफिकदादा, अनिल अंतुरकर, प्रसाद ढाकेफळकर यांनी बाजू मांडली. त्यात रिझर्व्ह बॅँकेने कलम ११० अन्वये केलेली बरखास्ती कशी अयोग्य आहे, याचे पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले तसेच बॅँकेचे कोणतेही इन्स्पेक्शन न करता निव्वळ नाबार्डने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही चुकीची कारवाई करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. बॅँकेची आर्थिकस्थिती उत्तम असून, कोणत्याही ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आलेल्या नाहीत, उलटपक्षी बॅँकेने ३१ मार्च २०१७ अखेर साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप केल्याची बाबही कागदपत्रानिशी न्यायालयाला सादर करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर सहकार खात्याने जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कृतीला स्थगिती दिली.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक