शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राज्यव्यापी कामगार परिषद : संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन एप्रिलमध्ये कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:08 AM

नाशिकरोड : केंद्र व राज्यातील शासन कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करत असून, कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

ठळक मुद्देमंत्रालयावर एक लाख कामगारांचा मोर्चा महामंडळे बंद करण्याच्या हालचाली

नाशिकरोड : केंद्र व राज्यातील शासन कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करत असून, कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याला सर्वच क्षेत्रातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहसंघटक विश्वास उटगी यांनी केले. सर्व कामगारांची एकजूट करून जिल्हानिहाय मेळावे घेऊन चार कोटी कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्यासाठी एप्रिल महिन्यात मंत्रालयावर एक लाख कामगारांचा मोर्चा काढण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.यू.एस. जिमखाना येथे शनिवारी (दि.६) विविध क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार-कर्मचारी परिषद हिंद मजदूर सभा प्रदेश अध्यक्ष शंकरराव साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना संयुक्त कृती समितीचे सहसंघटक विश्वास उटगी म्हणाले की, पब्लिक सेक्टर विकून ४ लाख कोटी रुपये करण्याचे शासनाचे मनसुबे आहेत. रिक्त पदे भरायची नाहीत, राज्यातील ५६ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली सुरू असून, सर्व काही उद्योगपती व उद्योजकांच्या खिशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही उटगी यांनी केला. परिषदेमध्ये जे ठराव मंजूर करण्यात आले त्यांची पुस्तिका करून ती तळागाळातील कामगारांपर्यंत पाहचवून कामगारांचे प्रबोधन केले पाहिजे. याकरिता संपूर्ण राज्यात कामगारांनी सह्यांची मोहीम राबवून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व क्षेत्रातील एक लाख कामगारांचा मोर्चा काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उटगी यांनी केले. अध्यक्ष पदावरून बोलताना शंकरराव साळवी यांनी सध्याचे भांडवलशाही शासन असून, कामगार चळवळ संपुष्टात आणण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप केला. हिंद मजदूर सभेचे संजय वढावकर वगळता इतर सर्वच कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. व्यासपीठावर मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, हिंद मजदूर सभेचे राज्य उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, वर्क्स फेडरेशन राज्य उपाध्यक्ष ज्योती नटराजन, बॉश एम्प्लॉईज युनियनचे प्रवीण पाटील, श्रमिक संघाचा महासंघ विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कामगार पदाधिकाºयांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. स्वागत प्रवीण पाटील यांनी केले. प्रास्ताविक कामगार नेते जगदीश गोडसे व सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.परिषदेमध्ये बारा ठराव मंजूरपरिषदेमध्ये शासन मालकधार्जिणे व कामगार हितास बाधा आणणारे बदल करून सध्याचे कायदे व लाभ मोडीत काढत आहे. ४४ केंद्रीय कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी ४ कामगार संहिता नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने अप्रेंटीस कायदादेखील बदलला आहे. देशात ९० टक्के कामगारांना कोणत्या कामगार कायद्याचे संरक्षण नाही, ज्या कामगारांना कायद्यान्वये संरक्षण आहे तेथे अंमलबजावणी होत नाही अशा शासनाच्या कामगार विरोधी निर्णयाच्या विरोधात १२ ठरावांना मंजुरी देण्यात आली. तसेच कामगार हिताच्या विविध १८ मागण्यांच्या ठरावालादेखील मंजुरी देण्यात आली.