शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर निर्णयासाठी राज्यव्यापी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:12 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  आयटक कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रतन इचम व कॉ. राजू देसले होते. यावेळी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची, भूसंपादनाची व न्यायालयीन लढाईची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. सिन्नर तालुक्यातील अधिकारी शेतकºयांचा मानसिक छळ तसेच चुकीची माहिती देत आहेत. याचा शेतकºयांनी निषेध केला. इगतपुरी तालुक्यात पेसा कायद्यांतर्गत असलेल्या ग्रामपंचायती समृद्धी महामार्गाच्या विरोधात गेलेल्या असताना दलालांचा वापर प्रशासन करीत आहे. या विरोधात ३० आॅक्टरोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महसूल आयुक्त महेश झगडे यांची भेट घेण्यात येणार आहे. या बैठकीत राज्यव्यापी आढावा घेऊन, राज्यव्यापी कायदेशीर लढ्याची भूमिका तसेच पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. या बैठकीस भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, अरुण गायकर, शिवाजी पवार, दौलत दुभाषे, पांडुरंग वारुंगसे, शांताराम ढोकणे, सोमनाथ तातळे, लालू तातळे, बबन वेलजाळी, सुनील पठाडे, रावसाहेब हरक आदी उपस्थित होते.७ नोव्हेंबरला बैठकशेतकरी संघर्ष समिती शासकीय अधिकाºयांकडून शेतकºयांची संमती मिळविण्यासाठी घराचा मोबदला, जिरायती बागायती जमिनी लावण्याचे तसेच इतर आमिषांचे संदर्भात लेखी तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, सिडको येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.