शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चालू खरेदीचा मकाही रेशनमधून विकणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:08 IST

नाशिक : गेल्या वर्षी आधारभुत किंमतीत खरेदी केलेला मका वर्षभरानंतर खराब होऊ लागल्याचे पाहून त्याची एक रूपये किलो प्रमाणे रेशन मधून विक्री सुरू केलेली असताना व सदरचा मका घेण्यास शिधापत्रिकाधारकांचा विरोध कायम असतानाही चालू वर्षी सध्या राज्यात ठिकठिकाणी खरेदी केला जात असलेल्या मक्याची फेब्रुवारीपासून रेशनमधून विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने ...

ठळक मुद्दे१४ रूपयांची खरेदी एक रूपयात विक्री : गव्हात कपातशासनाने १४२५ रूपये प्रतिक्विंटल दराने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाकडून खरेदी केंद्रे सुरू केले

नाशिक : गेल्या वर्षी आधारभुत किंमतीत खरेदी केलेला मका वर्षभरानंतर खराब होऊ लागल्याचे पाहून त्याची एक रूपये किलो प्रमाणे रेशन मधून विक्री सुरू केलेली असताना व सदरचा मका घेण्यास शिधापत्रिकाधारकांचा विरोध कायम असतानाही चालू वर्षी सध्या राज्यात ठिकठिकाणी खरेदी केला जात असलेल्या मक्याची फेब्रुवारीपासून रेशनमधून विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नजिकच्या चार महिन्यात रेशनचे धान्य खाणाºयांना सक्तीने मक्याची रोटी खावी लागणार आहे.राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, सातारा, सांगली, सोलापुर, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा, नागपुर या तेरा जिल्ह्यांमध्ये सध्या खरीप हंगामातील भरडधान्य म्हणून ओळखल्या जाणाºया मक्याची राज्य शासनाच्यावतीने आधारभुत किंमतीत खरेदी केली जात आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यात मक्याचे उत्पादन वाढले आहे, त्यातच खुल्या बाजारात भाव पडल्यामुळे मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने १४२५ रूपये प्रतिक्विंटल दराने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाकडून खरेदी केंद्रे सुरू केले आहेत. ३१ डिसेंबर पर्यंत शासनाकडून मका खरेदी केला जाणार आहे. सदरचा मका पणन महामंडळाने खरेदी करून तो तालुक्याच्या तहसिलदारांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय वा खासगी गुदामात ठेवायचा आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने अशाच प्रकारे १३६५ रूपये आधारभुत किंमतीत मका खरेदी केला होता व राज्यातील ठिकठिकाणच्या गुदामात तो साठवून ठेवला, या मक्याला कीड लागली तर काही ठिकाणी त्याचे पीठ होऊ लागले होते. शिवाय दर महिन्याला गुदामाचे लाखो रूपयांचे भाडे थकत चालल्याचे पाहून नोव्हेंबर महिन्यात शासनाने सदरचा मका सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली असून, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबियांना दरमहा दिल्या जाणाºया गव्हाच्या प्रमाणात घट करून त्याऐवजी सक्तीचे मका दिला जात आहे. राज्य सरकारने १३६५ रूपये दराने खरेदी केलेला मका रेशनमधून एक रूपये प्रती किलो दराने देण्यास सुरूवात केली असून, त्यातील ७० पैसे कमीशन रेशन दुकानदाराला मिळणार आहे,म्हणजेच सरकारला किलो मागे तीस पैसे मिळतील.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक