शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:41 IST

चांदवड : कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबिल माफ करावे व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, सुकदेव केदारे, किरण डावखर, नानासाहेब मोरे, लहानु ठाकरे, छबू पूरकर, लक्ष्मण आहेर, दशरथ कोतवाल, अशोक मोरे, एकनाथ मोरे यांचा समावेश होता.

चांदवड : कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबिल माफ करावे व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, सुकदेव केदारे, किरण डावखर, नानासाहेब मोरे, लहानु ठाकरे, छबू पूरकर, लक्ष्मण आहेर, दशरथ कोतवाल, अशोक मोरे, एकनाथ मोरे यांचा समावेश होता.उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, वीज वितरण कंपनीने दिलेले संपूर्ण बिल माफ करावे, कोरोनाकाळात शेती व शेतकरीविरोधात काढलेले सर्व आदेश मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, खते त्वरित उपलब्ध करून देण्यात यावेत, आयकर न भरणाºया कुटुंबांना दरमहा ७५०० रुपये कोविडसाठी प्रत्येक कुटुंबाला देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती दहा किलो धान्य द्यावे, डिझेल, पेट्रोलची दरवाढ मागे घ्यावी, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, आरोग्य कायद्याची केरळच्या पद्धतीने अंमलबजावणी करा, १४ वर्षांखालील मुलांना सर्व माध्यमाचे मोफत शिक्षण द्यावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.चांदवड तालुक्यातील पाटे येथील शेतकरी भाऊसाहेब अमृता ठाकरे यांनी चांदवड तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. पाटे व्हाया काजीसांगवी चांदवड रस्ते विकास मंडळ यांनी तयार केलेल्या नकाशा २००१ ते २१ प्रमाणे पाटे काजीसांगवी चौफुली ते बसथांबा या सरळ रेषेत व नकाशा प्रमाणे व्हावा, शोभा शहाजी सोनवणे यांची जागा१८ बाय ९ असताना १५ बाय ४० बांधकाम सुरू झाले तेव्हा फोनद्वारे व लेखी अर्ज करूनसुद्धा ग्रामपंचायतीने अतिक्रमण बांधकाम बंद केले नाही, सर्व कामात कर्तव्यात कसूर केल्यामुळे ग्रामसेवक सरपंच यांना बडतर्फे करावे, वडिलोपार्जित कब्जे वहीवाटीतील १५० वर्षांपूर्वीची जागेवर केलेले बांधकाम कायम करावे व त्याचा मी कर भरलेला आहे या मागण्यासाठी सदरचे उपोषण सुरू आहे.

टॅग्स :Nashikनाशिक