शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुका मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:25 IST

निफाड : ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर लॉन्स, मंगल कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या वतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे सरकारी पट्टी, कर, वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली

निफाड : ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर लॉन्स, मंगल कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या वतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आले.यावेळी नगरसेवक अनिल कुंदे, दिलीप कापसे, निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष तानाजी टर्ले, उपाध्यक्ष पांडुरंग आव्हाड, सरचिटणीस अनिल कहाणे, खजिनदार मनोहर मोगल, कार्याध्यक्ष नंदू कापसे, सल्लागार जयदत्त व्यवहारे, नरेंद्र कायस्थ, सुनील वडघुले, सदस्य गणेश काळे, राकेश चव्हाण, रवींद्र खालकर, शांताराम शिंदे, संदीप माळोदे, सागर सानप आदी उपस्थित होते.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्यात १५ मार्चनंतर राज्यातील लॉन्स, मंगल कार्यालयात विवाह सोहळे आयोजित करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे व ५० लोकांच्या उपस्थितीत घरी विवाह समारंभ आयोजित करण्यास अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.या नियमामुळे तालुक्यातील लॉन्स, मंगल कार्यालय पूर्णपणे बंद असून, सर्व काम ठप्प झाले आहे. मागील वर्षी लॉन्स, मंगल कार्यालय पूर्णपणे बंद असल्याने आमचे आर्थिक उत्पन्न बुडाले. त्यामुळे आमचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडला गेला आहे. यावर्षीही १५ मार्चनंतर लॉन्स, मंगल कार्यालय येथे विवाह सोहळे आयोजित करण्यास बंदी घातल्याने आमच्या संकटात आणखी भर पडली आहे. त्यामुळे लॉन्स, मंगल कार्यालयाची भरावी लागणारी सरकारी पट्टी, कर, वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिवाय ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर विवाह सोहळे लॉन्स, मंगल कार्यालय येथे करण्यास परवानगी द्यावी, हे विवाह सोहळे संपन्न करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदार