शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पावसाच्या पाण्याची विल्हेवाट तत्काळ लावण्यासाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:18 IST

मालेगाव : येथील सोयगावातील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने महानगरपालिका आयुक्त दीपक कासार यांना दिले.

ठळक मुद्देपावसाळ्यात साचणाºया पाण्यापासून कायमची सुृटका करण्याची मागणी

मालेगाव : येथील सोयगावातील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने महानगरपालिका आयुक्त दीपक कासार यांना दिले. मालेगाव महानगर- पालिकेच्या हद्दीतील सोयगावमधील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होते. या परिसरात दर पावसाळ्यात पाणी साचून ते घरांमध्ये शिरते. संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान होते. अन्न व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.निवेदनावर निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रीतेश शर्मा, दिनकर गायकवाड, हर्षल गायकवाड, योगेश शर्मा, नम्रता शर्मा, दीपक जाधव, शालिनी जाधव, रवींद्र विसपुते, अनिता विसपुते, छोटू चव्हाण, शीतल चव्हाण, कौतिक देवरे, सुलोचना देवरे, यशवंत पवार, पुष्पा पवार, वाल्मीक मोरे, छाया मोरे, विनायक पवार, लाराबाई पवार, गोरख राणे, आशाबाई राणे, माधुरी निकम आदींच्या स्वाक्षºया आहेत.महानगरातील महत्त्वाचा भाग असलेल्या सोयगाव विष्णुनगर परिसरात पावसाळ्यात पाणी साचून रस्ते बंद झाल्याने शहराशी संपर्कतुटतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. वृद्धांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पाइपलाइनमधून हेच खराब पाणी नळांना येते. परिसरात साथीच्या आजाराने ग्रस्त होण्याचे प्रमाण वाढते.त्यामुळे साचलेले पाणी गटारी सेक्शन पंप लावून पाणी उपसावे व पावसाळ्यात साचणाºया पाण्यापासून कायमची सुृटका करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.