शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी इगतपुरी तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:39 IST

नांदूरवैद्य : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने इगतपुरीचे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देयापुढील काळात शिवसंग्राम व मराठा समाज आक्रमक

नांदूरवैद्य : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने इगतपुरीचे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.मराठा समाजाला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान शासनाने व मराठा समाजाचे विषय हाताळणाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, व्यवस्थित नियोजन केले नाही, सर्वांना विश्वासात घेतले नाही.आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना निर्णय घेऊन त्वरित न्याय द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, कोपर्डी व तांबडी नराधमाना फाशीची शिक्षा लवकर व्हावी, मराठा आरक्षणसाठी ज्यांनी बलिदान दिले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व नोकरी द्यावी, सारथी संस्था पूर्ण ताकदीने कार्यान्वित करावी, राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात यावी, मराठा समाजाच्या मुलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी भागभांडवल सरकारने द्यावे आणि सर्वात म्हणजे मराठा समाज ज्या मुला-मुलींना ईएसबीसी २०१४, एसईबीसी २०१८/१९ व इतर विभागातील पदांची भरती सर्व प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली आहे, त्या सर्वांना मंत्रिमंडळाने एकत्रितपणे निर्णय घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन शिवसंग्रामचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गाढवे पाटील, इगतपुरी शिवसंग्राम संघटनेचे युवक अध्यक्ष सोमनाथ वाजे यांनी इगतपुरीचे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना देण्यात आले.कोट...शासनाने निवेदनाप्रमाणे लवकर निर्णय नाही घेतला तर मराठा समाज लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय शिवसंग्राम संघटना स्वस्थ बसणार नाही.- महेश गाढवे, जिल्हा कार्याध्यक्ष, शिवसंग्राम नाशिक.आजपर्यंत शांततेत मोर्चे काढले. यापुढील काळात शिवसंग्राम व मराठा समाज आक्रमक व्हायच्या आत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.- सोमनाथ वाजे, युवक तालुकाध्यक्ष, शिवसंग्राम.

(१८ नांदुरवैद्य)मराठा समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन इगतपुरीचे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना देताना महेश गाढवे सोमनाथ वाजे.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण