सिन्नर : प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर नायब तहसीलदार जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले.आशिया खंडातील सर्वात मोठी कांदाबाजारपेठ आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील असंख्य शेतकरी बांधव कांदा मोठ्या प्रमाणावर घेतात येथील शेतकर्यांची वार्षिक उलाढाल या पिकांवर अवलंबून आहे. यातून मिळणार्या उत्पन्नावर बर्याच शेतकर्यांचे उदरिनर्वाह शिक्षण आरोग्य हे सर्व अवलंबून असते. यातच केंद्र सरकारने कांदा पिकावर निर्यात बंधी घालून शेतकर्यांचे एकप्रकारे शोषण आज केंद्र सरकारने केले आहे. या जाचक निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांचा मोठा विरोध केला जात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे निर्यात बंधी न हटवल्यास प्रहार विद्यार्थी संघटनेच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे यांच्या उपस्थितीत केले जाईल यावेळेस प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष सुनिल गर्जे, ऋ षिकेश सानप, सौरव शेळके यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
प्रहार विद्यार्थी संघटनेचे नायब तहसीलदार यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 16:51 IST
सिन्नर : प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर नायब तहसीलदार जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील असंख्य शेतकरी बांधव कांदा मोठ्या प्रमाणावर घेतात येथील शेतकर्यांची वार्षिक उलाढाल या पिकांवर अवलंबून आहे.
प्रहार विद्यार्थी संघटनेचे नायब तहसीलदार यांना निवेदन
ठळक मुद्दे शेतकर्यांची वार्षिक उलाढाल या पिकांवर अवलंबून