जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे करावीत याकारीता ग्रामस्थांच्या वतीने त्यावेळी प्रथम नागरिक सरपंच सिमा बधान यांच्यासह त्यावेळी प्रथम नागरिक सरपंच सिमा बधान यांच्यासह आमदारांना निवेदन देण्यात आले.गावच्या वतीने आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे तसेच शेतकरी मित्र बिंदु शर्मा आदींसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी गावांतर्गत काँक्रिटीकरण, भूमिगत गटार, आदिवासी वस्ती संपूर्ण कॉंक्रिटीकरण, तसेच एकलव्य समाज मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौक फ्लेवर ब्लॉक बसवणे तसेच पाट कॅनॉल चौफुळी ते चिंचकसाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून मिळावे आदी विकासकामांचे निवेदन देण्यात आले व आमदारांनी ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.मीनाताई मोरे यांनीही जिप सेस मधून कामे देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच सीमा बधान, उपसरपंच सुलाबाई बोरसे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव, श्याम निकम, निंबा बाई मोरे, लताबाई सूर्यवंशी, दादा निकम, पोलीस पाटील तेजस वाघ, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विविध विकास कामांकरीतानवी शेमळी गावातर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:50 IST
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे करावीत याकारीता ग्रामस्थांच्या वतीने त्यावेळी प्रथम नागरिक सरपंच ...
विविध विकास कामांकरीतानवी शेमळी गावातर्फे निवेदन
ठळक मुद्देकामे लवकर पूर्ण करण्याचे आमदारांनी दिले आश्वासन